अभिनेता शाहरुख खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. किंग खान त्याच्या कुटुंबाबद्दल देखील चाहत्यांना सांगत असतो. एका मुलाखतीत शाहरुख खान याने बायको गौरी खान हिच्या पहिल्या सिझेरियनबद्दल सांगितलं होतं. एका जुन्हा मुलाखतीत शाहरुख खान याने पहिला मुलगा आर्यन खान याच्या जन्माचा अनुभव सांगितला होता. शाहरुख खान आणि गौरी खान यांनी दोन मुलं आणि एक मुलगी आहे.
शाहरुख खान याला विचारलं, डिलिव्हरीच्या वेळी गौरीसोबत होतास? यावर गौरी म्हणाली, ‘शाहरुख उत्साही होता. सतत फोटो काढत होता. तेव्हा डॉक्टर शाहरुखला म्हणाले, आम्हाला आमचं काम करु द्या…’ पुढे स्वतः शाहरुख खान याने त्याने अनुभवलेले क्षण सांगितले.
शाहरुख खान म्हणाला, ‘डॉक्टर बाळाला जन्म देत होते आणि मी सर्वकाही पाहात होतो. गौरीवर सुरु असलेली शस्त्रक्रिया. डॉक्टर मला म्हणाले तू हे सर्व पाहू नकोस. पण मला वेगळा अनुभव येत होता. मी हिंसेला खतपाणी घालत नाही. पण निसर्गाने दिलेली ठेव मला अनुभवायची होती. रक्ताचा लाल रंग, निळ्या रंगाचा भाग आणि पिवळी चरबी… सर्वकाही आश्चर्यकारक होतं. असे रंग मी कधीही पाहिलं नव्हते…’ असं किंग खान म्हणाला.
पुढे शाहरुख खान याला बाळ झाल्यानंतर तुझा अनुभव काय होता. असा प्रश्न विचारण्यात आला. यावर किंग खान म्हणाला, ‘मी म्हणालो याला (आर्यन) घेवून जा. मला गौरीला बघायचं आहे. तिची प्रकृती ठिक आहे ना? तेव्हा मला आर्यनबद्दल काही भावना नव्हत्या. पण गौरी माझ्यासाठी सर्वकाही होती…’ सांगायचं झालं तर, शाहरुख खान पत्नी गौरी हिच्यावर प्रचंड प्रेम करतो. अनेक ठिकाणी दोघांनी कायम एकत्र स्पॉट करण्यात येतं.
शाहरुख खान याच्या कुटुंबाबद्दल सांगायचं ढालं तर, शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या पहिल्या मुलाचं नाव आर्यन खान असं आहे. दुसऱ्या मुलीचं नाव सुहाना खान असं आहे. तर तिसऱ्या मुलाचं नाव अबराम खान असं आहे. अबराम याचा जन्म सरोगेसीच्या माध्यमातून झाला.
शाहरुख खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शाहरुख खान पहिल्यांदा लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चाहते देखील किंग खानच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.