Jawan | ‘जवान’चा मोठा धमाका, रिलीजच्या अगोदरच शाहरुख खान याच्या चित्रपटाने कमावले तब्बल इतके कोटी

| Updated on: Sep 06, 2023 | 11:03 PM

बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान याचा जवान चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने चाहत्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे चित्रपट धमाका करत आहेत.

Jawan | जवानचा मोठा धमाका, रिलीजच्या अगोदरच शाहरुख खान याच्या चित्रपटाने कमावले तब्बल इतके कोटी
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा जवान (Jawan) चित्रपट रिलीज होण्यासाठी आता काही अवघे तास शिल्लक आहेत. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसतोय. शाहरुख खान याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून धमाल कमाई करताना दिसत आहेत. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने तगडी कमाई केलीये.

शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट आहे. मुळात म्हणजे 2019 ला शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेला. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट बघताना देखील दिसले.

शाहरुख खान याचे आता एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळत आहे. आता चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळतंय. कारण जवान चित्रपट रिलीज होण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. जवान चित्रपट तूफान चर्चेत आहे.

विशेष बाब म्हणजे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवान चित्रपट मोठा धमाका करताना दिसला आहे. ॲडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून शाहरुख खान याच्या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 30.54 कोटींची कमाई जगभरातून केल्याचे सांगितले जात आहे. जवान चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग हे 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलंय.

विशेष म्हणजे शाहरुख खान हा जोरदार पद्धतीने जवान चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतोय. शाहरुख खान याने काही दिवसांपूर्वीच आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एका खास सेशनचे आयोजन केले होते. या सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधताना देखील दिसला. धमाकेदार पद्धतीने शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता.

शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. शाहरुख खान याचा चित्रपट ओपनिंग डेलाच 100 कोटींच्या आसपास कमाई जगभरातून करेल असे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. आता शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट नेमका काय धमाका करतो हे उद्याच कळेल. मात्र, चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल मोठे क्रेझ नक्कीच आहे. शाहरुख खान याचे चाहते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.