मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार असे पुनरागमन चित्रपटांमध्ये तब्बल चार वर्षांनंतर केले आहे. 2019 मध्ये झिरो हा चित्रपट (Movie) रिलीज झाला आणि तो फ्लाॅप गेला. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते. शेवटी शाहरुख खान याने पठाणच्या माध्यमातून दणदणीत असे पुनरागमन केले आहे.
विशेष म्हणजे हे यंदाचे वर्षे शाहरुख खान याच्यासोबतच त्याच्या चाहत्यांसाठी देखील अत्यंत खास आहे. कारण शाहरुख खान याचे एका मागून एक असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अगोदर पठाण आणि आता जवान चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे जवाननंतर लगेचच डंकी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शाहरुख खान हा सेशनचे खास आयोजन करत आहे आणि चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत आहे. यामुळे जवान हा चित्रपट चर्चेत आहे.
Love will find a way to your heart….Chaleya Teri Aur….#Chaleya, #Hayyoda and #Chalona Song Out Tomorrow! #Jawan releasing worldwide on 7th September 2023, in Hindi, Tamil & Telugu. pic.twitter.com/ntAgvgsKLx
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 13, 2023
नुकताच आता शाहरुख खान याच्या जवान चित्रपटातील चलोना गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या गाण्यामध्ये नयनतारा आणि शाहरुख खान रोमांटिक होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांना देखील हे टीझर आवडल्याचे बघायला मिळत आहे. या टीझरला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात प्रेम देताना दिसत आहेत.
शाहरुख खान यानेच या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. नयनतारा आणि शाहरुख खान यांच्यामध्ये एक स्वीट केमेस्ट्री बघायला मिळत आहे. दोघेही रोमांटिक डान्स करताना या गाण्यामध्ये दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे जवान चित्रपटाला गौरी खान हिनेच प्रोड्यूस केले आहे.
काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सेशनचे आयोजन केले होते. या सेशनमुळे एका चाहत्याने शाहरुख खान याला थेट नयनतारा हिच्याबद्दल प्रश्न विचारला होता. विशेष म्हणजे या प्रश्नाचे उत्तर अत्यंत हटके स्टाईलने देताना शाहरुख खान हा दिसला.