मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन चर्चेत आहे. या प्री वेडिंग फंक्शनसाठी फक्त बाॅलिवूड कलाकारच नाही तर हाॅलिवूडचे कलाकार देखील उपस्थित राहिले. गेल्या काही महिन्यांपासून या प्री वेडिंग फंक्शनची तयारी सुरू होती. नाश्त्यामध्ये 700 आणि जेवणामध्ये 2500 पदार्थ हे पाहुण्यांना वाढण्यात आले. प्री वेडिंग फंक्शनमध्ये पोहचणाऱ्या पाहुण्यांकडून खास त्यांचा डाएट देखील मागून घेण्यात आला. राहण्याची देखील खास व्यवस्था करण्यात आली. आता या प्री वेडिंग फंक्शनमधील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
सैफ अली खान, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, करीना कपूर, विकी काैशल, जान्हवी कपूर, अन्यया पांडे, कतरिना कैफ, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, आलिया भट्ट, नीतू कपूर,रणबीर सिंह असे जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार या प्री वेडिंग फंक्शनमध्ये पोहचले. यावेळी कलाकार हे धमाल करताना दिसले.
आंतरराष्ट्रीय स्टार रिहाना देखील या प्री वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी झाले. आता या प्री वेडिंग फंक्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आता सध्या सोशल मीडियावर शाहरुख खान याचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा सूत्रसंचालन करताना दिसतोय.
King Khan is here to rule at the #AnantRadhikaCelebration 🔥#AnantAmbani #AnantRadhikaWedding#ShahRukhKhan #SRK
pic.twitter.com/es0heWVz8o— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) March 2, 2024
विशेष म्हणजे व्हिडीओच्या सुरूवातीलाच शाहरुख खान हा जय श्री राम म्हणताना देखील दिसतोय. जय श्री राम’चा नारा शाहरुख खानने दिला. शाहरुख खान म्हणाला की, प्रत्येक शुभ कार्यापूर्वी देवाचे नाव घेतले जाते, असे म्हणत तो सूत्रसंचालनाला सुरूवात करताना दिसतोय. अंबानींच्या पार्टीमध्ये शाहरुख खान याने सूत्रसंचालन केले आहे. आता शाहरुख खान याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
विशेष म्हणजे या प्री वेडिंग फंक्शनमध्ये तीन खानचा खास डान्स देखील बघायला मिळाला. शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांनी धमाकेदार असा डान्स केला. फक्त हेच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी धमाकेदार डान्स केले आहेत. दीपिका पादुकोण देखील रणवीर सिंह याच्यासोबत खास डान्स करताना दिसली. ज्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला.