मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) त्याच्या हॉट लूक आणि उत्तम कामासाठी ओळखला जातो. नुकताच तो त्याच्या पत्नी मीरा कपूर हिला घेऊन त्याच्या नव्या घराच्या बांधकामाच्या पाहणीसाठी गेला होता. नविन घराचा फोटो पत्नी मीरा कपूर हिने तिच्या सोशल मीडियीवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहीद कपूर आणि त्याची पत्नी त्यांच्या नव्याने तयार होणाऱ्या डुप्लेक्स अपार्टमेंटच्या पायऱ्यावर उभे आहेत.
अभिनेता शाहीद कपूर त्याच्या पत्नीसमवेत नव्या घराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेला होता. अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा कपूर हिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. या फोटोमध्ये मीरा कपूरने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. मीरासोबतच शाहीदनेसुद्धा मॅचिन्ग टी-शर्ट घातला आहे. हा फोटो शेअर करताना मीरा कपूरने ‘एका वेळी एक पाऊल’ असे सुद्धा लिहले आहे.
शाहीद कपूरने 2018 मध्ये ही जागा विकत घेतली होती. साध्या या जागेवर शाहीद डुप्लेक्स अपार्टमेंटचे बांधकाम सुरू केले आहे. या अपार्टमेंटमधून समोर सुंदर असा समुद्र दिसणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ह्या अपार्टमेंटची किंमत 56 कोटी रुपये सांगण्यात आली आहे. हा डुप्लेक्स अपार्टमेंट इमारतीच्या 42 आणि 43 व्या मजल्यावर आहे.
DNA ने दिलेल्या एका रिपोर्ट अनुसार अभिनेता शाहीद कपूरचे हे घर 4000 चौरस फुटांचे आहे. शाहीद कपूर आणि मिरा कपूर नेहमी या घराला भेट देतात. या घराचे अपडेट ते नेहमी सोशल मीडियावर टाकत असतात. सध्या ते त्यांच्या जुहूयेथील घरात त्यांच्या दोन्ही मुलांसोबत राहतात.
अलीकडेच त्याच्या एका चित्रपटाचे शूटिंग गोव्यात पूर्ण केले. शाहीद कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटामच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ‘जर्सी’हा त्याचा आगमी चित्रपट आहे. हा चित्रपट एका तेलुगु चित्रपटाचा रिमेक आहे. असे वृत्त आहे की या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, शाहिद कपूर दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी चित्रपटात काम करू शकतो. हा चित्रपट महाभारतातील ‘कर्ण’ यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट रॉनी स्क्रूवाला प्रॉडक्शन अंतर्गत बनवला जाणार आहे
इतर बातम्या :
Aryan Khan Drug Case: कुणी मेकअप आर्टिस्ट तर कुणी शिक्षक, पाहा आर्यन खानसोबत आणखी कोणकोण अटकेत?