बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेता शाहिद कपूर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण आता शाहिद पत्नी मीरा राजपूत हिने पोस्ट केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आला आहे. मीरा हिने लेक मिशा हिचे काही फोटो पोस्ट केले आहे. मिशाच्या 8 व्या वाढदिवसाचं निमित्त साधत मीरा हिने लेकीचे फोटो पोस्ट केले आहे. सांगायचं झालं तर, शाहिद आणि मीरा कायम मुलांना कॅमेऱ्यापासून दूर ठेवतात. पण आता खुद्द मीराने लेकीटे फोटो पोस्ट केले आहे.
मीरा राजपूत हिने लेकीच्या वाढदिवशी खास फोटो पोस्ट करत शुभेच्छा देखील दिल्या. सध्या सर्वत्र मिशा हिच्या क्यूटनेसची चर्चा रंगली आहे. लेकीचे फोटो पोस्ट करत मीरा कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘मी माझं पूर्ण आयुष्य तुझ्यावर प्रेम करण्यासाठी अर्पण करेल… माझ्या लेकीला आठव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा… तू माझ्यासाठी सर्वात खास गिफ्ट आहेस… कायम आनंदी राह…’ असं म्हणत मीराने लेकीसाठी प्रेम व्यक्त केलं.
सध्या सोशल मीडियावर मिशाच्या फोटोंची चर्चा रंगली आहेत. मिशाला फक्त चाहतेच नाहीतर, अनेक सेलिब्रिटींनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मीरा राजपूत हिच्या पोस्टवर अभिनेत्री अनन्या पांडे हिने देखील कमेंट करत मिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अनन्या पांडे हिने पोस्टवर कमेंट करत ‘हॅप्पी बर्थडे मिश्की…’ मिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सांगायचं झालं तर, अनन्या पांडे हिच्या नावाची चर्चा शाहिदचा सावत्र भाऊ ईशान खट्टन याच्यासोबत रंगली होती. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं. पण दोघांचे नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
शाहिद कपूर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता कायम स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करत असतो. अभिनेता कायम पत्नी आणि मुलांसोबत आनंद साजरा करत असतो. शाहिद आणि मीरा यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.