मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूरची जोडी ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी होती. हे दोघं जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. शाहिद आणि करीनाच्या अफेअरने बी-टाऊन आणि चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. हे दोघं एकमेकांना डेट करत असतानाच शाहिदचं अभिनेता फरदीन खानसोबत जोरदार वाद झाला होता. ‘फिदा’ या चित्रपटात फरदीन आणि करीनाने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात दोघांचा किसिंग सीन होता. याच किसिंग सीनवरून हा वाद झाला होता. एका जुन्या मुलाखतीत फरदीन खान या वादाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. इतकंच नव्हे तर त्याने शाहिदला बालिश म्हटलं होतं.
या मुलाखतीत फरदीन म्हणाला होता, “होय, हे खरंय. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र नाही आहोत. शाहिद आणि माझं पटत नाही. पण तो काही मोठा वाद नव्हता. तो माझ्या मागे माझ्याबद्दल बरंवाईट बोलत असल्याचं मी खूपदा ऐकलंय. तो जरा बालिशच आहे. त्याला काही समस्या होत्या आणि मी त्याला सांगितलं होतं की माझ्याबद्दल बोलू नकोस. मी आणि करीना फक्त चांगले मित्र आहोत. सुदैवाने आम्ही एकमेकांसोबत जो वेळ घालवला होता, त्यातून आमच्यात एकमेकांविषयी विश्वास आणि कम्फर्ट निर्माण झाला होता. पण त्यापेक्षा अधिक आमच्यात काहीच नाही.”
फरदीनच्या या मुलाखतीनंतर शाहिद कपूर जेव्हा ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये पोहोचला, तेव्हा तोसुद्धा फरदीन खानसोबतच्या वादावर व्यक्त झाला. “मला वैयक्तिकरित्या त्याच्याशी काहीच समस्या नाही. जर त्याला माझ्याशी काही समस्या असेल, तर त्याने थेट मला फोन करायला पाहिजे होता किंवा त्याबद्दल थेट माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. पण त्याने माध्यमांसमोर बोलणं निवडलं. त्यामुळे मी त्यावर अजून काय बोलू शकतो”, असं शाहिद म्हणाला होता.
शाहिद आणि करीना यांचं 2006 मध्ये ब्रेकअप झालं. करीनाने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. तर शाहिद आणि मीरा कपूर यांनी लग्नगाठ बांधली. करीनाला तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहेत. तर शाहिद-मीराला मिशा आणि झैद ही दोन मुलं आहेत.