Shahid Kapoor | घराणेशाहीच्या टीकांवरून शाहिद कपूर भडकला; म्हणाला “तुम्हाला काय माहीत माझा संघर्ष?”

| Updated on: Jun 05, 2023 | 11:23 AM

शाहिदने प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर यांच्या टीममध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. 'ताल' आणि 'दिल तो पागल है' यांसारख्या चित्रपटांतील गाण्यांमध्ये तो बॅकग्राऊंड डान्सर म्हणून झळकला होता.

Shahid Kapoor | घराणेशाहीच्या टीकांवरून शाहिद कपूर भडकला; म्हणाला तुम्हाला काय माहीत माझा संघर्ष?
Shahid Kapoor
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून घराणेशाहीचा वाद सुरू आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर हा वाद पुन्हा नव्याने चर्चेत आला. स्टारकिड्सना इंडस्ट्रीत सहजरित्या संधी मिळते, तर इतरांना त्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. याबाबत आता अभिनेता शाहिद कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. घराणेशाहीमुळे सहज संधी मिळाल्याच्या कमेंटवर त्याने राग व्यक्त केला आहे. शाहिद हा अभिनेते पंकज कपूर यांचा मुलगा आहे. तर त्याची आई नीलिमा अझीम यासुद्धा अभिनेत्री आहेत. त्यांच्यामुळे शाहिदला इंडस्ट्रीत येणं सोपं झालं, असं म्हणणाऱ्यांना शाहिदने उत्तर दिलं आहे.

बॉलिवूड बबल या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला, “लोकांना असं वाटतं की याचे बाबा अभिनेते आहेत, त्यामुळे त्याला इंडस्ट्रीत सहज संधी मिळाली असेल. पण हे ऐकून मला खूप वाईट वाटतं कारण माझा संघर्ष तुम्हाला माहीत नाही. माझे वडील पंकज कपूर आहेत म्हणून मला सगळं सहज मिळालं असं नाही. मी तर त्यांच्यासोबत राहतसुद्धा नाही. मी माझ्या आईसोबत राहतो. वडिलांचाही स्वाभिमान कोणाला कामासाठी फोन करू देणार नाही. ते मला असं कधीच बोलणार नाहीत की मी अमुक व्यक्तीला फोन करतो आणि तू जाऊन भेट. ते तसे नाहीत. त्यांच्याकडून मदत न मागण्याचा माझाही स्वाभिमान अधिक आहे. इंडस्ट्रीत मी माझा संघर्ष केला. गेल्या 20 वर्षांत मी प्रचंड मेहनत घेतली आहे.”

शाहिदने प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर यांच्या टीममध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. ‘ताल’ आणि ‘दिल तो पागल है’ यांसारख्या चित्रपटांतील गाण्यांमध्ये तो बॅकग्राऊंड डान्सर म्हणून झळकला होता. त्यानंतर हळूहळू त्याला जाहिरात आणि म्युझिक व्हिडीओच्या ऑफर्स मिळू लागल्या होत्या. वयाच्या 22 वर्षी त्याने ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शाहिदने आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये बरेच हिट चित्रपट दिले आहेत. ‘उडता पंजाब’, ‘जब वी मेट’, ‘कबीर सिंग’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं.

हे सुद्धा वाचा