Mira Rajput | ‘बार्बी’ सिनेमा पाहिल्यानंतर मीराने साधला ‘हॉलिवूड’वर निशाणा; म्हणाली…

| Updated on: Jul 25, 2023 | 1:03 PM

'बार्बी' सिनेमाला प्रेक्षकांचं संमिश्र प्रतिसाद; टीव्ही अभिनेत्री जुही परमार हिच्यानंतर अभिनेता शाहिद कपूरच्या पत्नीने साधला 'हॉलिवूड'वर निशाणा... सध्या सर्वत्र 'बार्बी' सिनेमाची चर्चा

Mira Rajput | बार्बी सिनेमा पाहिल्यानंतर मीराने साधला हॉलिवूडवर निशाणा; म्हणाली...
Follow us on

मुंबई | 25 जुलै 2023 : दिग्दर्शक ग्रेटा गेरविग दिग्दर्शित आणि मार्गोट रॉबी, रायन गॉस्लिंग स्टारर सिनेमा ‘बार्बी’ २१ जुलै २०२३ रोजी सिनेमागृहात दाखल झाला आहे. सध्या सर्वत्र ‘बार्बी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर देखील अनेक जण गुलाबी रंगाचे कपडे घालून फोटो पोस्ट करत आहेत. सध्या सर्वत्र ‘बार्बी’ सिनेमाचा ट्रेन्ड सर्वत्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मात्र सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही प्रेक्षकांना सिनेमा आवडत आहे, तर काही प्रेक्षकांनी मात्र ‘हॉलिवूड’वर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र ‘बार्बी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. टीव्ही अभिनेत्री जुही परमार हिच्यानंतर अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत ‘हॉलिवूड’वर निशाणा साधला आहे.

‘बार्बी’ सिनेमा पाहिल्यानंतर मीरा राजपूत हिने प्रतिक्रिया दिली आहे. मीराने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत हॉलिवूडवर निशाणा साधत बॉलिवूड कशाप्रकारे योग्य आहे… हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मीरा म्हणाली, ‘हॉलिवूड असा आहे, हॉलिवूड तसा आहे… हॉलिवूड बॉलिवूडप्रमाणे गाणं आणि डान्स करु शकत नाही..’ असं मीरा म्हणाली..

हे सुद्धा वाचा

बॉलिवूडबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूड सिनेमे डान्स आणि उत्तम गाण्यांमुळे प्रसिद्ध आहे. मीरा हिचा पती आणि अभिनेता शाहिद कपूर त्याच्या डान्स कौशल्यामुळे देखील ओळखला जातो… मीराने ‘बार्बी’ सिनेमा पाहिल्यानंतर हॉलिवूडवर निशाणा साधला आहे, तर बॉलिवूडचं कौतुक केलं आहे.

दिग्दर्शक ग्रेटा गेरविग दिग्दर्शित बार्बी सिनेमात मार्गोट रॉबी, रायन गॉस्लिंग यांच्यासोबत कॅट मॅकिनॉन, मायकल सेरा, हेलेन मिरेन, एरियाना ग्रीनब्लाट आणि इस्सा राए यांनी देखील मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिक्रिया मिळत असली तरी, बॉक्स ऑफिसवर मात्र सिनेमा तगडी कमाई करताना दिसत आहे.

चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर बार्बी सिनेमाने चार दिवसात २१.१५ कोटी रुपयांचा कमाआ केली आहे. मेटल डॉलवर आधारित ‘बार्बी’ सिनेमा जगभरात चर्चेत आहे. पण भारतात क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘ओपेनहायमर’ सिनेमाला ‘बार्बी’ हारवू शकलेला नाही.