शाहरुख खानचा सासू बाईंसोबत दुबईत दमदार डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

| Updated on: Oct 28, 2024 | 2:41 PM

Shah Rukh Khan: सासू आणि लेकीसोबत शाहरुख खान याचा दुबईत दमदार डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... किंग खानचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शाहरुख खानचा सासू बाईंसोबत दुबईत दमदार डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us on

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता व्हायरल व्हिडीओंमुळे चर्चेत आला आहे. शाहरुख खान दुबईतील एका पार्टीमध्ये सासूबाई सविता छिब्बर यांच्यासोबत डान्स करताना दिसला. किंग खानचा सासूबाईंसोबत व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, शाहरुख खान मुलगा आर्यन खान याच्या ब्रँड इव्हेंटसाठी दुबईत होता. शाहरुख दुबईतील डायवोला येथे एका पार्टीत उपस्थित होता.

पार्टीमध्ये शाहरुखने डान्स करण्यासाठी बोलावलं. व्हिडीओमध्ये कुठेच अभिनेत्याची पत्नी गौरी खान दिसली नाही. पण गौरी देखील पार्टीमध्ये होती…. असं सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान सासूबाईंचा हात पकडून डान्स करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये सविता छिब्बर देखील शाहरुख सोबत डान्स करताना दिसत आहेत. शाहरुख आणि सविता यांच्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाहा व्हिडीओ…

हे सुद्धा वाचा

 

 

पार्टीमध्ये शाहरुख खान याने लेक सुहाना खान हिच्यासोबत देखील डान्स केला. दोघांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शाहरुख खान लेकीसोबत ‘घूंघरू टूट गए’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

 

 

सध्या सोशल मीडियावर शाहरुख खान याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. किंग खान पाहून चाहत्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे. शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील किंग खानच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

 

शाहरुख खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘किंग खान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शाहरुख खान लेक सुहाना खान हिच्यासोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत आहे.