‘ज्याची पदवी खरी आहे, तो ताठ मानेने जगतो…’, Shahrukh Khan च्या डिग्रीचा फोटो व्हायरल, मोदींसोबत अभिनेत्याची तुलना

| Updated on: Apr 05, 2023 | 1:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा विषय चर्चेत असताना, किंग खानची डिग्री सोशल मीडियावर तुफान व्हायरल; नेटकरी कमेंट करत म्हणाले..., 'या' कॉलेजमध्ये शिकला आहे किंग खान

ज्याची पदवी खरी आहे, तो ताठ मानेने जगतो..., Shahrukh Khan च्या डिग्रीचा फोटो व्हायरल, मोदींसोबत अभिनेत्याची तुलना
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर सध्या अभिनेता शाहरुख खान याचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्याच्या हातात दिल्ली युनिव्हर्सिटी ( DU) ची डिग्री दिसत आहे. डिग्री हातात असल्यामुळे किंग खान फोटोमध्ये आनंदी दिसत आहे. शाहरुख खान याचा डिग्रीसोबत फोटो व्हायरल होत असल्यामुळे अभिनेत्याची तुलना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होत आहे. सध्या सर्वत्र शाहरुख आणि त्याच्या डिग्रीची चर्चा तुफान रंगत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. मात्र गुजरात कोर्टाने यासाठी स्पष्ट नकार दिला. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ट्विट करत म्हणाले, ‘देशाचे पंतप्रधान किती शिकले आहेत, हे जाणून घेण्याचा अधिकार देशाला नाही का? कोर्टात त्यांनी डिग्री दाखवण्यास विरोध केला, का? त्यांची डिग्री दाखवण्याची मागणी करणाऱ्यावरच दंड लावला? असं का घडत आहे? कमी शिकलेले पंतप्रधान देशासाठी खूप धोकादायक ठरू शकतात…’ असा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा विषय चर्चेत असताना, किंग खानची डिग्री सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शाहरुखचा फोटो पाहिल्यानंतर नेटकरी मोदी यांची तुलना शाहरुख खान याच्यासोबत करत आहेत. शाहरुखच्या डिग्रीच्या फोटोवर नेटकरी ‘ज्याची पदवी खरी आहे, तो ताठ मानेने जगतो…’ असं कमेंट करत म्हणत आहेत.

 

 

शाहरुख खान याच्या फोटोबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याच्या डिग्रीचा फोटो आताचा नसून २०१६ मधील आहे. जेव्हा शाहरुख जवळपास २८ वर्षांनंतर हंसराज कॉलेजमध्ये पोहोचला होता. तेव्हा अभिनेता ‘फॅन’ सिनेमाचं प्रमोशन करत होता.

तेव्हा २८ वर्षांनंतर आपल्या कॉलेजमध्ये जावून अभिनेता प्रचंड आनंदी होता. शहरुखने ‘फॅन’ सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. ‘फॅन’ सिनेमा अपयशी ठरल्यानंतर चार वर्षांनंतर अभिनेत्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. शाहरुख आता ‘जवान’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.