मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याच्याबद्दल आज प्रत्येक चाहत्याला अनेक गोष्टी माहिती आहे. शाहरुख खान याचे सिनेमे, अभिनेत्याचं कुटुंब, अभिनेत्याचं खासगी आयुष्य… इत्यादी गोष्टी चाहत्यांना माहिती आहेत. पण किंग खान याच्याबद्दल अशा काही गोष्टी आहेत, ज्या चाहत्यांना बिलकूल माहिती नाहीत. शाहरुख खान गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 2023 मध्ये शाहरुख खान स्टारर ‘पठाण’, ‘जवान’ सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. शाहरुख खान याने चार वर्षांनंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केल.
सिनेमातील प्रत्येक सीन उत्तम व्हावा म्हणून शाहरुख खान कायम प्रयत्न करत असतो. कामाप्रति असलेल्या प्रमाणिकतेमुळे किंग खान यशाच्या शिखरावर आहे. पण यासाठी अभिनेत्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिने किंग खान याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
फराह खान म्हणाली, ”मैं हूं ना’ सिनेमात मला शाहरुख खान याच्याकडून एक शर्टलेस सीन हवा होता. पण तेव्हा किंग खान याच्या पाठीला दुखापत झाली होती. म्हणून ‘मैं हूं ना’ सिनेमात अभिनेत्याचा शर्टलेस सीन शूट करता आला नाही. पण ‘ओम शांती ओम’ सिनेमात शाहरुखने शर्टलेस सीन दिला..’
”ओम शांती ओम’ सिनेमात शर्टलेस सीन उत्तम व्हावा यासाठी शाहरुखने दोन दिवस पाणी देखील प्यायलं नव्हतं. कारण पाणी प्यायल्यामुळे पोटाचा आकार थोड्या प्रमाणात वाढतो… सिनेमातील ‘दर्द-ए-डिस्को’ गाण्यात शाहरुख याने शर्टलेस सीन दिला होता..’ असं देखील फरहान खान म्हणाली…
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा रंगलेली आहे. शाहरुख याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. म्हणून किंग खान याच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. शाहरुख खान देखील कायम सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.
शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. ‘डंकी’ सिनेमा मल्टी स्टारर सिनेमा असणार आहे.