मुंबई | 07 सप्टेंबर 2023 | ‘जब मैं विलेन बनता हूं ना तो मेरे सामने कोई भी हीरो टिक नहीं सकता’, ‘चाहिये तो आलिया भट्ट पर उमर में थोड़ी छोटी है’, “जेल में आदमी तेरे हैं पर ये जेल मेरी औरतों का है.” यांसारखे अनेक डायलॉग अभिनेता शाहरुख खान याचे आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. बॉलिवूडचा बादशहा याची एक झलक पाहण्यासाठी चहाते कायम उत्सुक असतात. एवढंच नाही तर शाहरुख खान याच्यासाठी काय करता येईल, त्याला कसं इम्प्रेस करता येईल. यासाठी देखील चहाते कायम काही ना काहीतरी करत असतात. आता देखील किंग खान याच्या एका चाहत्याने असंच काही केलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या चाहत्याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
व्हिडीओमध्ये अभिनेत्याचा एक चाहता किंग खान याचा बंगला ‘मन्नत’ची पाटी स्वतःच्या शर्टने पुसताना दिसत आहे. ‘मन्नत’ बंगल्याबाहेर अनेक किंग खान याचे चाहते फोटो आणि व्हिडीओ काढत असतात. शिवाय अभिनेत्याच्या बंगल्याबाहेर उभं राहून किंग खान याची झलक पाहाता यावी म्हणून उत्सुक असतात. पण व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या चाहत्याने स्वतःचा शर्ट काढून ‘मन्नत’ची पाटी पुसली आहे.
सोशल मीडियावर शाहरुख खान याच्या चाहत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी व्हिडिओ वर लाईक आणि कमेंट चा देखील वर्षाव करत आहेत. किंग खान याच्या चाहत्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामध्ये चाहते किंग खान याचे डायलॉग आणि गाण्यांवर व्हिडीओ तयार करताना दिसतात.
किंग खान याचे देखील सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर देखील शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. एवढंच नाही तर, अभिनेता आस्क एसआरके सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत असतो.
शाहरुख खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने आतापर्यंत असंख्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. यंदाच्या वर्षी ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्याने चार वर्षांनंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाने प्रदर्शित होताच सर्व रेकॉर्ड मोडले. यंदाच्या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणार ‘पठाण’ पहिला सिनेमा ठरला आहे.
‘पठाण’ सिनेमानंतर किंग खान ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. ‘जवान’ सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. किंग खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करत असतात.