मुंबई | 17 मार्च 2024 : अभिनेता आर. माधवन याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या ‘शैतान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात दमदार अभिनय करत माधवन याने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सर्वच स्तरातून अभिनेत्याचं कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमा तगडी कमाई करताना दिसत आहे. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने लेक वेदांत यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाहीतर, यावेळी अभिनेत्याने घराणेशाहीबद्दल देखील खुलासा केला आहे.
घराणेशाहीबद्दल वक्तव्य करताना अभिनेत्याने मुलगा वेदांत याचा देखील उल्लेख केला. सोशल मीडियावर वेदांत याची इतर स्टार किस्डसोबत होणाऱ्या तुलनेबद्दल अभिनेत्याने नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर वेदांत याचे अनेक मीम्स देखील व्हायरल होत असतात. या गोष्टीचा त्रास आर. माधवन आणि पत्नीला होतो.
मुलगा वेदांत याच्याबद्दल अभिनेता म्हणाला, ‘मी माझ्या मुलाला इतर स्टार किड्सपेक्षा वेगळं समजतो. मला असं वाटतं मुलांची तुलना करणं योग्य नाही. सरिता (आर.माधवनची पत्नी) आणि माझा यासाठी विरोध आहे. कोणत्या एका मुलाची तुलना दुसऱ्या मुलासोबत करणं योग्य नाही. मीम तयार करणाऱ्यांना कळत नाही समोरच्यावर त्याचा किती फरक पडतोय…’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘वेदांत स्टार किड असल्यामुळे त्याला अटेंशन मिळतं. त्याने त्याच्या आयुष्यात जे काही मिळवलं आहे, ते मी पुन्हा घेऊ शकत नाही. त्याने मेडल जिंकण्यासोबतच राष्ट्रीय विक्रम देखील रचला आहे. स्टार किड असणं सोपी गोष्ट नाही…’ असं देखील आर.माधवन मुलाबद्दल म्हणाला.
आर. माधवन याचा मुलगा वेदांत याच्याबद्दल सांगायचं झालं तर, वेदांत एक उत्तम स्विमर आहे. फार कमी वयात वेदांत याने स्विमर म्हणून यश मिळवलं आहे. वेदांतने 48 व्या ज्युनियर नॅशनल ॲक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये चार सुवर्णपदके आणि तीन रौप्य पदके जिंकली आहेत. आर. माधवन कायम लेकाचं यश सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
आर. माधवन कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आर. माधवन कायम लेकाच्या यशाबद्दल देखील चाहत्यांना सांगत असते. चाहत्यांकडून वेदांत याचं कौतुक देखील होतं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आर. माधवन आणि अभिनेत्याला वेदांत माधवन याची चर्चा रंगली आहे.