Shakti Kapoor | मी आजसुद्धा तिच्यासमोर हात जोडतो; पत्नीविषयी असं का म्हणाले शक्ती कपूर?

| Updated on: Oct 09, 2023 | 3:01 PM

71 वर्षीय शक्ती कपूर यांचं खरं नाव सुनील कपूर असं होतं. मात्र फिल्म इंडस्ट्रीत हे नाव योग्य वाटणार नाही म्हणून त्यांनी सुनील नाव बदलून शक्ती असं ठेवलं. हळूहळू शक्ती कपूर यांनी बॉलिवूडमध्ये खलनायक भूमिकांसाठी आपली ओळख निर्माण केली.

1 / 5
अभिनेते शक्ती कपूर यांचा जन्म 3 सप्टेंबर 1952 रोजी दिल्लीमध्ये झाला. अभिनेते सुनील दत्त यांची नजर जेव्हा शक्ती कपूर यांच्यावर पडली तेव्हा त्यांनी 'रॉकी' या चित्रपटासाठी त्यांना कास्ट केलं. 'रॉकी' आणि 'कुर्बानी' या चित्रपटांमुळे त्यांना चांगलीच ओळख मिळाली.

2 / 5
शक्ती कपूर यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण शिवांगी कोल्हापुरेशी लग्न केलं. शिवांगी त्यांच्यापेक्षा बारा वर्षांनी लहान आहेत. शिवांगी त्यांची चाहती म्हणून पहिल्यांदा शक्ती कपूर यांना भेटली होती. मात्र हळूहळू त्या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

3 / 5
एका पॉडकास्टमध्ये शक्ती कपूर यांनी सांगितलं होतं, "शिवांगी दिसायला खूपच सुंदर होती आणि त्याकाळी तिला बऱ्याच चित्रपटांचे ऑफरसुद्धा मिळत होते. तिने सावन कुमार टांक यांचा 'लैला' हा चित्रपट साइन केला होता. मात्र हा चित्रपट साइन केल्यानंतर मी तिच्याकडे विनंती केली की तू कृपया चित्रपट करू नको. तू गृहिणी बनून राहा."

4 / 5
शक्ती कपूर यांनी पुढे सांगितलं, "मी शिवांगीला म्हटलं की मला तुला गृहिणी म्हणून पहायचंय. आज 40 वर्षे झाली आणि तिने माझ्यासाठी स्वतःचं करिअर सोडलं. मी माझ्या करिअरच्या शिखरावर असताना शुभांगीशी लग्न केलं होतं आणि त्यानंतर माझं आयुष्य आणखी उत्तम झालं. त्यासाठी मी आजही तिच्यासमोर हात जोडतो."

5 / 5
शिवांगी आणि शक्ती कपूर यांची श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर ही दोन मुलं आहेत. या दोघांनीही फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली आहे. शक्ती कपूर हे पत्नी शिवांगीला आपला लकी चार्म मानतात.