Bigg Boss 16 Shalin Bhanot : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि शालीन भनोट याची पहिली पत्नी दलजीत कौर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दलजीत कौर हिने जेव्हा दुसऱ्या लग्नाबद्दल खुलासा केला, तेव्हा पासून अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. दुसऱ्या लग्नाची घोषणा केल्यानंतर दलजीत कौर पहिल्यांदा होणाऱ्या पतीसोबत समोर आली आहे. दलजीत कौर हिच्या होणाऱ्या पतीचं नाव निखिल पटेल (Nikhil Patel) असं आहे. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दलजीत आणि निखिल यांच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहेत.
फोटोमध्ये दलजीत आणि निखिल दोघे प्रचंड आनंदी दिसत आहेत. सध्या सर्वत्र दलजीत आणि निखिल यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. शालीन याची पहिली पत्नी दलजीत कौर (dalljiet kaur) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. शालीन याच्यासोबत पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे.
खुद्द दलजीत कौर सोशल मीडियाच्या माध्यमातून निखिल याच्यासोबत असलेल्या नात्याला दुजोरा दिला आहे. दलजीत कौर मार्च महिन्यात दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने एक फोटो पोस्ट केला होता. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली.
कोण आहे दलजीत कौर हिचा होणारा पती?
दलजीत कौर हिचा होणारा पती निखिल पटेल (nikhil patel) एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतो. लग्नानंतर दलजीत कौर तिच्या आणि शालीनचा मुलगा जेडन याला देखील यूकेमध्ये घेवून जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये लग्न होणार आहे. लग्नानंतर काही दिवस दलजीत कौर नैरोबी (अफ्रीका) याठिकाणी राहणारा आहे. कारण निखिल सध्या नैरोबी याठिकाणी काम करत आहेत. त्यानंतर दलजीत कौर नव्या कुटुंबासोबत लंडन याठिकाणी शिफ्ट होणार आहे.
दलजीत कौर आणि शालीन भनोट याचं नातं दलजीत कौर आणि शालीन भनोट यांनी लग्नानंतर ६ वर्षात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दलजीत कौर आणि शालीन भनोट यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव जेडन असं आहे. नातं सुधारण्यासाठी दोघांना एकमेकांना अनेक संधी देखील दिल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एवढंच नाहीतर, दलजीतने शालीनवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले. शालीन रागीट आणि आक्रमक स्वभावाचा पुरुष असल्याचं दलजीतने सांगितलं. शिवाय बिग बॉसमध्ये देखील अभिनेत्री टीना दत्ताने शालीन रागीट आणि आक्रमक स्वभावाचा पुरुष असल्याचं सांगितलं.