शमिता शेट्टी ‘या’ सात प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत होती रिलेशनशिपमध्ये; एकाचा दुर्दैवी मृत्यू

| Updated on: Jan 31, 2023 | 12:08 PM

अनेक सेलिब्रिटींसह शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी हिचं नाव एका क्रिकेटरसोबत देखील जोडण्यात आलं; एका बॉयफ्रेंडचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अभिनेत्री आजही जगतेय एकटी...

शमिता शेट्टी या सात प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत होती रिलेशनशिपमध्ये; एकाचा दुर्दैवी मृत्यू
शमिता शेट्टी 'या' सात प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत होती रिलेशनशिपमध्ये; एकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us on

Shamita Shetty seven relationship : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shamita Shetty) हिची बहीण शमिता शेट्टी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करु शकली नाही. मोठ्या पडद्यावर अपयशी ठरलेली शमिता तिच्या खासगी आयुष्यामुळे मात्र कायम चर्चेत असते. एवढंच नाही सोशल मीडियावर देखील शमिता कायम सक्रिय असते. नुकताच अभिनेत्रीला एका पार्टी दरम्यान टीव्ही अभिनेता अमिर अली याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी अभिनेता राकेश बापट याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री तुफान चर्चेत आली. पण राकेश बापट याच्यासोबत नाव जोडण्यापूर्वी शमिताच्या नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. शमिताच्या सात रिलेशनशिपबद्दल आज जाणून घेवू.

शमिता शेट्टी हिने तिच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाचा खुलासा ‘बिग बॉस ओटीटी’ दरम्यान केला. शमिताच्या पहिल्या बॉयफ्रेंडचं कार अपघातामध्ये निधन झालं. त्यानंतर शमिताचं अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं. पण आजही अभिनेत्री सर्व काही असूनही एकटी आयुष्य जगते.

हे सुद्धा वाचा

मीडियारिपोर्टनुसार शमिताचं नाव आफताब शिवदेसानी यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. सतत वाद होत असल्यामुळे शमिता आणि आफताब यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेत्रीचं नाव हरमन बावेजा याच्यासोबत अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं. पण दोघांचं नातं देखील जास्त काळ टिकलं नाही.

 

 

एवढंच नाही तर, क्रिकेटर युवराज सिंग याच्यासोबत देखील अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं. रिलेशिपमध्ये आल्यानंतर दोघांनी कधी त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही. कालांतराने दोघांचं नातं देखील संपलं. त्यानंतर शमिताचं नाव अभिनेता मनोज बाजपेयी सोबत जोडण्यात आलं. दोघांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली.

शमिता आणि मनोज यांनी ‘फरेब’, ‘बेवफा’ सिनेमांमध्ये काम केलं आहे. रिपोर्टनुसार जेव्हा शमिता आणि मनोज यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या तेव्हा मनोजचं लग्न झालेलं होतं. त्यामुळे अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. शमिताने ‘मोहब्बतें’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हा अभिनेता उदय चोप्रा याच्यासोबत देखील अभिनेत्रीच्या नावाची चर्चा झाली.

जेव्हा शमिता शेट्टी हिने ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये एक स्पर्धक म्हणून भाग घेतला, तेव्हा अभिनेत्रीचं नाव अभिनेका राकेश बापट याच्यासोबत जोडण्यात आलं. शिवाय घरातून बाहेर आल्यानंतर देखील अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसले पण अखेर त्यांचं ब्रेकअप झालं.

शमिता शेट्टी हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्रीच्या ‘The Tenant’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर शमिता पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ‘The Tenant’ सिनेमा १० फेब्रुवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.