ब्रेकअपनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत दिसली शमिता शेट्टी; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ

| Updated on: Jan 29, 2023 | 1:30 PM

राकेश बापट याच्यानंतर शमिता शेट्टीच्या आयुष्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री? अभिनेत्यासोबत व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण

ब्रेकअपनंतर या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत दिसली शमिता शेट्टी; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ
ब्रेकअपनंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत दिसली शमिता शेट्टी; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ
Follow us on

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. शमिता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अनेक व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळे शमिता कायम चर्चेत असते. आता देखील शमिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शमिता एका पार्टीमधून बाहेर येताना दिसत आहे. पार्टीमधून बाहेर येताच अभिनेता अमिर अली शमिताला मिठी मारतो आणि अभिनेत्रीला कारपर्यंत सोडतो. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय व्हिडीओवर चाहत्यांच्या वेग-वेगळ्या कमेंट येत आहेत.

शमिताचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ आशीष चौधरी याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीचा आहे. ही पार्टी आशीषच्या घरी वांद्रे याठिकाणी रंगली होती. पार्टीमध्ये शमिता आणि अमिर शिवाय जेनिफर विंगेटल सोबत इतर सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, पण शमिता आणि अमिरच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

 

 

शमिता आणि अमिर यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सने कमेंट करत अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘हा किती दिवस राहिल? एक महिना?’, तर अन्य एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘शमिता अमिरला डेट करत आहे…’, आणखी एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘नव्या प्रवासाची सुरुवात…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र शमिता शेट्टी हिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहेत.

शमिता शेट्टी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. बिग बॉसमध्ये शमिता आणि अभिनेता राकेश बापट यांच्यात असलेल्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. दोघांच्या लव्हस्टोरीची तुफान चर्चा रंगली.

शमिता शेट्टी हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्रीच्या ‘The Tenant’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर शमिता पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ‘The Tenant’ सिनेमा १० फेब्रुवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.