मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करु शकली नाही. शमिताने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली पण चाहत्यांचं मनोरंजन अभिनेत्री करू शकली नाही. शमिताला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं नाही, पण अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात देखील अनेक चढ – उतार आले. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढत असताना अभिनेत्रीचं अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं. पण कोणासोबतही नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. शमिता कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. शमिता हिच्याकडे आज पैसा, संपत्ती सर्वकाही आहे, पण तरी देखील अभिनेत्री एकटी आयुष्य जगते. वयाच्या ४४ व्या वर्षी देखील शमिता एकटी आहे.
शमिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस’च्या माध्यमातून अभिनेत्रीच्या आयुष्यात अभिनेता राकेश बापट याची एन्ट्री झाली. बिग बॉस शो संपल्यानंतर देखील दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या ब्रेकअपची देखील तुफान चर्चा रंगली.
राकेश याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीचं नाव अभिनेता अमिर अली याच्यासोबत जोडण्यात आलं. ज्यावर अभिनेत्रीने मौन सोडलं होतं. सध्या अभिनेत्री सिंगल पण आनंदी आयुष्य जगत आहे. पण अभिनेत्याच्या आयुष्यात असा एक व्यक्ती होता, ज्यामुळे शमिचा आजही एकटी आहे.. असं अनेकदा समोर आलं.
अभिनेत्रीच्या आयुष्यातील ‘तो’ खास अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता मनोज वाजपेयी आहे. शमिता आणि मनोज यांनी ‘फरेब’ आणि ‘बेवफा’ या सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. याच दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.
जेव्हा शमिता आणि मनोज यांच्या नात्याच्या चर्चा रंगत होत्या तेव्हा मनोज विवाहित होते. याच कारणामुळे शमिताने मनोज यांच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शमिताने लग्न करण्याचा निर्णय घेतलाच नाही. अभिनेत्री आजही एकटी आयुष्य जगत आहेत. पण मनोज त्याच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.
शमिता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट करत असते. शिवाय चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन अभिनेत्री करत असते.