मुंबई – लता दिदींच्या निधनानंतर अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक मान्यवरांनी लता दीदींना अनोख्या पध्दतीनं श्रध्दांजली वाहिली आहे. त्यामध्ये राजकीय, क्रिकेट, मनोरंजन आणि दीदींच्या चाहत्यांकडून ट्विटर आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रध्दांजली वाहिली आहे. मागील अनेक दिवसांपासून लता मंगेशकर (lata mangeshkar) या कोरोनावरती मुंबईतील ब्रीच कॅन्डी रूग्णालयात (breach candy hospital, mumbai) उपचार घेत होत्या. तसेच त्या कोरोनातून (covid – 19) पुर्णपणे ब-या देखील झाल्या होत्या असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पंरतु काल अचानक त्यांची तब्येत खालावली असल्याचं वृत्त आलं होत. सकाळी त्यांचं 8 वाजून 12 मिनिटांनी उपचार घेत असताना निधन झालं. त्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या गाण्यामुळं कॅन्सरचा लढा कसा दिला हे सांगितलं आहे.
गाण्यामुळं कॅन्सरच्या काळात जगण्याला बळ मिळालं
“प्रचंड दुखाची गोष्ट आहे, मी असा विचार करतो, की लताताई नसत्या तर आपलं आयुष्य किती भयानक आणि निराश झालं असतं. इतकं त्यांच्या संगीतानं आपल्या पिढ्यानं पिढ्या व्यापलेल्या आहेत. असा स्वर आज आपल्यातनं निघून गेला. भयानक मोठी हानी आहे ही, कधीही भरून न निघणारी, अशा काही व्यक्ती समाज्यामध्ये असतात, तसेच असे काही कलाकार समाजामध्ये असतात. त्यांची जागा पुढच्या शतकानुशतके कोणी घेऊ शकत नाही. संपुर्ण विश्वामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे.” अशी भावनिक श्रध्दांजली अभिनेते शरद पोंक्षे यांनी वाहिली. तसेच ते म्हणाले की, मी ज्यावेळी 2019 ला कॅन्सरशी लढा देत होतो. तो अख्खा पिरीयड माझा लता दीदींच्या गाण्यामुळं सुसज्ज झाला होता. संगीत आणि त्यांचा स्वर्गीय आवाज, प्रचंड मोठी हानी झाली आहे. संगीतातला स्वर हरवल्यासारखं झालंय असंही ते म्हणाले.
अनेक मान्यवरांनी त्यांना त्यांच्या गाण्यातून श्रध्दांजली वाहिली आहे. संजय राऊत यांनी एक पर्व संपलं असं ट्विट केलं आहे. त्याचबरोबर त्यांची प्रसिध्द असलेली गाणी सुध्दा त्यांनी शेअर केली आहेत. रोहित पवार, विराट कोहली, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे अशा अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
गेली २८ दिवस त्या मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात होत्या. कधी तब्येतीत सुधारणा झाल्याच्या तर कधी तब्येत खाल्यावल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर काल त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची बातमी आली. तेव्हाच संपूर्ण भारताच्या मनात धस्स झालं होतं. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ६० वर्ष त्यांच्या आवाजाची रसिक प्रेक्षकांच्या मनावर भुरळ होती. ३५ भाषांतील ३० हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली. गायनविश्वातील प्रत्येक जण त्यांना गानसरस्वती मानत होता.