बॉलिवूडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. कोणी सेलिब्रिटी लग्न करत आहेत, तर कोणाच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. लग्नामुळे अभिनेत्रीच्या घरात देखील आनंदाचं वातावरण आहे. सांगायचं झालं तर, ‘हीरामंडी’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सोनाक्षी हिने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये लग्नासाठी उत्सुक आहे… असं वक्तव्य केलं होतं. अखेर सोनाक्षी लनकरच नवरी होणार आहे.
सोनाक्षी सिन्हा जून महिन्यातील 23 तारखेला नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. म्हणजे येत्या 23 तारखेला सोनाक्षी लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. सोनाक्षी बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार आहे… अशी माहिती समोर येत आहे. पण दोघांनी देखील यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
सोनाक्षी हिच्या वाढदिवशी झहीर याने खास अंदाजात अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. इजहार-ए-बयां करत झहीर याने सोनाक्षी हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात सोनाक्षी – झहीर यांनी ठराविक लोकांना निमंत्रण केलं आहे. मित्र – कुटुंब यांच्याशिवाय ‘हीरामंडी’ सीरिजच्या संपूर्ण कास्टला सोनाक्षीने लग्नासाठी बोलावल्याची माहिती समोर येत आहे.
लग्नाची निमंत्रण पत्रिका मॅगझीनच्या मुखपृष्ठाप्रमाणे डिझाइन करण्यात आली आहे. पत्रिकेवर ‘अफवा खऱ्या आहेत.’ असं लिहिण्यात आलं आहे. लग्नासाठी पाहुण्यांना फॉर्मल कपडे घालून येण्यास सांगण्यात आले असून मुंबईतील बुस्टन येथे लग्नसोहळा साजरा केला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
सोनाक्षी हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री पूर्वी अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये कपिलने अभिनेत्रीला लग्न कधी करतेय? असं विचारलं होतं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘जखमेवर मीठ चोळू नको… तुला माहिती आहे मला लग्नाची किती घाई आहे…’ सध्या सर्वत्र सोनाक्षीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.