बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा ही बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. फक्त हेच नाही तर यांच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा हे गेल्या सात वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. 23 जून 2024 ला सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न होणार आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा यांचा विरोध असल्याची देखील जोरदार चर्चा आहे.
आता या लग्नाबद्दल पहिल्यांदाच जाहिरपणे बोलताना शत्रुघ्न सिन्हा दिसले. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा हे सोनाक्षीच्या लग्नाबद्दल बोलताना दिसले. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये सोनाक्षीने स्वत: ला एक बेस्ट अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. ते पाहून मी नक्कीच खूप जास्त खुश आहे. ती एक खूप चांगली कलाकार आहे आणि माझ्या अत्यंत जवळ आहे. पुढे लग्नाबद्दलही त्यांनी मोठा खुलासा केला.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, जर माझी मुलगी लग्न करत असेल तर मी तिच्या सपोर्टमध्ये कायमच असेल आणि माझे आर्शिवाद देखील तिच्यासोबत असतील. सोनाक्षी जो काही निर्णय घेईल, तिच्या निर्णयात मी तिच्यासोबत कायमच असेल. ती ज्याला कोणाला जीवनसाथी बनवत असेल तो व्यक्ती बेस्टच असेल. मुलीच्या लग्नात सर्वात आनंदी असलेला बाप मी असेल.
पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, एकच मुलगी आहे माझी… पण मी सोनाक्षी लग्न करणार की नाही हे सांगितले नाही, असेही शेवटी शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांचा सोनाक्षीच्या लग्नाला विरोध असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून रंगताना दिसली. शेवटी आता यावर स्पष्टपणे बोलताना शत्रुघ्न सिन्हा हे दिसले आहेत.
सोनाक्षी सिन्हा अर्जुन कपूर याला देखील डेट करत होती. मात्र, त्यानंतर दोघांचे रस्ते वेगळे झाले. सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सोनाक्षी सिन्हा हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसले. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.