मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने २४ डिसेंबर २०२२ रोजी आत्महत्या केली. अभिनेत्रीने बॉयफ्रेंडच्या मेकअप रुममध्ये गळफास लावत आत्महत्या केल्यामुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तुनिशा आत्महत्ये प्रकरणी अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खानला अटक करण्यात आली आहे. पण दिवसागणिक अभिनेत्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तुनिशा आत्महत्या प्रकरणी अभिनेत्याला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पण आता शिझानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
तुनिशा आत्महत्या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी शिझानला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तुरुंगात अभिनेत्यासोबत इतर कैद्यांप्रमाणे वागणूक होत आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
न्यायालयाने शिझानच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केल्यामुळे अभिनेत्याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंद करण्यात आलं आहे. दरम्यान शिझानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी वसई सत्र न्यायालयात अभिनेत्याचे केस कापू नका, कारण पुढे त्याला शुटिंग करायची आहे… अशी विनंती केली पण शिझानची मागणी फेटाळण्यात आली आहे.
एवढंच नाही, तर अभिनेत्याला घरचं जेवण देण्यासाठी मान्याता द्यावी अशी विनंती वकिलांकडून करण्यात आली होती. पण ही मागणी देखील फेटाळण्यात आली आहे. शिझानला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे.
शिझानच्या वकिलांनी तुनिशाच्या आईवर केले गंभीर आरोप
पत्रकार परिषदेत शिझानचे वकील म्हणाले, ‘तुनिशाच्या आईने तिचा गळा दाबला होता. तुनिशा ज्या मालिकेमध्ये काम करत होती, त्या मालिकेच्या दिग्दर्शकांना देखील अभिनेत्रीने हा प्रकार सांगितला होता.’ एवढंच नाही, तर तुनिशाला तिने मेहनतीने कमावलेले पैसे देखील आईकडून सतत मागावे लागत होते… असं देखील शिझानचे वकील पत्रकार परिषदेत म्हणाले.
आई द्यायची नाही पैसै!
तुनिशाने मेहनतीने कमावलेले पैसे तिची आई स्वतःकडे ठेवत असल्याचा दावा शिझानच्या वकिलांनी केला. ‘तुनिशाची आई तिचे सर्व पैसे स्वतःकडे ठेवायची, मुलीला पैसे द्यायची नाही. तुनिशाला सतत तिच्या आईकडून पैसे मागावे लागयचे. एवढंच नाही, तर तुनिशाची आई वनिता शर्मा पैश्यांसाठी सतत लेकीला विचारत असायची..’ असं देखील अभिनेत्याचे वकिल म्हणाले.