मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान तुरुंगात आहे. अभिनेत्याच्या वकिलांनी अनेकदा न्यायालयाकडे जामिन अर्ज दाखल केला पण, न्यायालयाने अभिनेत्याचा जामिन अर्ज फेटाळला आहे. गेल्या एक महिन्यापासून अभिनेता तुनिषा आत्महत्येप्रकरणी तुरुंगात आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर शिझानच्या कुटुंबाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. शिझान तुरुंगात आहे, तर याच दरम्यान अभिनेत्याच्या बहिणीची प्रकृती खालावल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुलगा तुरुंगात आणि मुलगी रुग्णालयात असल्यामुळे अभिनेत्याच्या आईने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तळमळ व्यक्त केली आहे. आभिनेत्याची आई म्हणते, ‘मला कळत नाही माझ्या कुटुंबाला कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळत आहे आणि का? गेल्या एक महिन्यापासून माझा मुलगा कोणताही पुरावा नसताना तुरुंगात बंद आहे. माझी मुलगी रुग्णालयात आहे.’
‘शिझानचा लहान भाऊ ऑटिस्टिकने त्रस्त आहे. दुसऱ्याच्या मुलावर प्रेम करणं गुन्हा आहे का? बेकायदेशीर आहे का? फलकने तुनिशावर लहान बहिणीसारखं प्रेम केलं ते बेकायदेशीर होतं का? त्यानंतर शिझान आणि तुनिशा यांच्या नात्यातील ब्रेकअप.. हे सुद्धा बेकायदेशीर होतं का? तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करणं चुकीचं होतं का?’
पुढे शिझानची आई म्हणाली, ‘आम्ही मुस्लिम आहोत म्हणून प्रेम करण्याचा आमचा हक्क नाही का?’ असा प्रश्न देखील शिझानच्या आईने विचारला आहे. सध्या शिझानच्या आईची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्री तुनिषा शर्माने शिझानच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर अभिनेत्रीच्या आईने शिझान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केलं. त्यानंतर पोलिसांनी शिझानला अटक केली. २४ डिसेंबर २०२२ मध्ये तुनिषाने शिझानच्या मेकअप रुममध्ये गळफास घेवून स्वतःचा जीवन प्रवास संपवला.