तुरुगांतून भावाला घेण्यासाठी आलेल्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद; अडीच महिन्यांनतर अभिनेत्याला जामीन मंजूर

| Updated on: Mar 05, 2023 | 12:36 PM

अभिनेत्रीच्या हत्ये प्रकरणी भावाला तुरुंगातून सोडवण्यासाठी बहिणींची खटपट; अडीच महिन्यांनतर अभिनेत्याला मिळाला दिलासा... फोटो व्हायरल

तुरुगांतून भावाला घेण्यासाठी आलेल्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद; अडीच महिन्यांनतर अभिनेत्याला जामीन मंजूर
Follow us on

Tunisha Sharma Case : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान (Sheezan Khan) वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तुनिषाने २४ डिसेंबर २०२२ रोजी ‘अली बाबा: दास्तान ए काबुल’ मालिकेच्या सेटवर गळफास घेवून स्वतःचं जीवन संपवलं. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी शिझान खान याला अटक करण्यात आली होती. पण आता अभिनेत्याला दिलासा मिळाला आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर शिझान खान तुरुंगातून बाहेर आला आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर त्याला २५ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

तुनीषा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खान याची रविवारी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. भावाला तुरुंगातून घेण्यासाठी अभिनेत्याच्या बहिणी फलक नाझ (Falaq Naazz) आणि शफक नाझ (Shafaq Naaz) आल्या होत्या. भावाला घरी घेवून जाताना दोन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

शिझान खान जवळपास ७० दिवस तुरुंगात होता. 2 फेब्रुवारी रोजी वसई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांच्या समोर झालेल्या युक्तिवादनंतर न्यायालयाने 4 मार्च रोजी निकाल दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे शिझान याला १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येत आहे. शिझान गेल्या अडीच महिन्यापासून ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

 

 

‘अली बाबा: दास्तान ए काबुल’ मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. तुनिषा हिने शिझान खान याच्या मेकअप रुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला. मुलीच्या आत्महत्येनंतर तुनिषा हिच्या आईने शिझान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

तुनिषा शर्मा हिच्या आईने केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी शिझान याला अटक केली. शिझान याला अटक झाल्यानंतर अभिनेत्याच्या कुटुंबियांनी देखील तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप केले. तुनिषाच्या आत्महत्येनंतर शिझान याच्या अडचणीत सतत वाढ होत असल्याचं चित्र दिसत होतं. पण आता अभिनेत्याला दिलासा मिळाला आहे.

तुनिशाचं बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तुनिषाने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3′ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.