मुंबई : अभिनेत्री शेफाली जरीवाला हिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच अनेकांच्या मनात स्वतःचं स्थान पक्क केलं. ‘कांटा लगा’ गाण्यातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या शेफाली हिला आजही चाहते विसरू शकलेले नाही. आपल्या भन्नाट डान्स आणि घायाळ अदांनी शेफालाने चाहच्यांच्या मनात घर केलं. आजही अभिनेत्री कायम चर्चेत असते. शेफालीने छोट्या पडद्यावर देखील तुफान कामगिरी केली. बिग बॉसमध्ये शेफालीने तिच्या खास अंदाजात चाहत्यांच लक्ष वेधलं.
बिग बॉसच्या घरात बेधडक वक्तव्य आणि बोल्ड अंदाजामूळे शेफाली कायम चर्चेत राहिली. ‘कांटा लगा’ आणि बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेली शेफाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत शेफाली चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
शेफाली जरीवाला सध्या गोवा याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. शेफाली गोव्यातील तिचे फोटो सध्ये इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे. गुलाबी आणि लाल रंगाच्या बिकिनीमध्ये शेफालीने फोटो शेअर केले आहेत. गोव्याच्या किनाऱ्यावर शेफाली आनंद लूटत आहे. सध्या सर्वत्र शेफालीचे फोटो व्हायरल होत आहे.
शेफालीचा बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे, दुसरीकडे काही चाहत्यांनी शेफालीला प्रश्न विचारले आहेत. शेफालीच्या हातावर असलेल्या जखमांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. शेफालीच्या हातावर व्रण पाहाता चाहत्यांनी ‘तुझ्या हातावर जखमा कसल्या, कोणासाठी कापलेला हात?’ असे अनेक प्रश्न चाहते विचारत आहेत.
तर शेफालीच्या हातावर असलेल्या जखना नक्की कशामुळे आहेत. हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण शेफालीचं सौंदर्य मात्र हैराण आहे. शेफाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर शेफालीचे २.७ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर अभिनेत्री फक्त १४४ लोकांना फॉलो करते.