मुंबई : भारतामधील नंबर एक न्यूज नेटवर्क TV9 वरून व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचे आता दुसरे पर्व लवकरच सुरू होतंय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार तयारी सुरू होती आणि आता ही तयारी पूर्ण झालीये. या कॉन्क्लेवमध्ये नामांकित व्यक्ती या सहभागी होणार आहेत आणि आपले अनुभव शेअर करणार आहेत. विशेष म्हणजे फक्त कोणत्याही एकाच क्षेत्रातील नव्हे तर विविध क्षेत्रातील व्यक्ती या कॉन्क्लेवमध्ये सहभागी होणार आहेत. या कॉन्क्लेवची खास थीम देखील ठेवण्यात आलीये. 25 फेब्रुवारी 2024 पासून ते 27 फेब्रुवारीपर्यंत हा कॉन्क्लेव असेल.
या कॉन्क्लेवची थीम ही इंडिया: पॉइज्ड फॉर दि नेक्स्ट बिग लीप आहे. कॉन्क्लेवच्या पहिल्या दिवशी बाउंडलेस भारत: बियॉन्ड बॉलिवूड नावाचे सेगमेंट असेल ज्यात अनेक कलाकार हे सहभागी होतील. विशेष म्हणजे हे कलाकार एकाच मंचावर असतील आणि आपआपले विचार मांडतील. विशेष म्हणजे या सत्रात शेखर कपूर हे देखील सहभागी होणार आहेत.
शेखर कपूर हे बॉलिवूडचे मोठे दिग्दर्शक आहेत. त्यांनी आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक विदेशी चित्रपट तयार केले आहेत. मिस्टर इंडियासारख्या त्यांच्या चित्रपटांनी मोठा काळ हा नक्कीच गाजवलाय. हेच नाही तर क्रिस्टोफर रिप्ले देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. क्रिस्टोफर रिप्ले हे हाॅलिवूडचे खूप जास्त मोठे नाव नक्कीच आहे.
क्रिस्टोफर रिप्लेने हाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये धमाके केले आहेत. रिकी केज हा देखील या कार्यक्रमात सहभाही होतोय. रिकी केज हा एक संगीतकार असून तो जगभरात लोकप्रिय आहे. हेच नाही तर रिकी केज याने त्याच्या करिअरमध्ये अनेक ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. रिकी केजचा चाहता वर्ग देखील अत्यंत मोठा आहे.
राकेश चौरसिया देखील सहभागी होणार आहेत. राकेश चौरसिया यांना देखील ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. राकेश चौरसिया हे पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना त्यांचे गुरू मानतात. वी सेल्वागणेश यांना देखील ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. साऊथमधील वी सेल्वागणेश यांचे मोठे नाव आहे. त्यांचा चाहता वर्गही खूप जास्त मोठा आहे.
व्हाट इंडिया थिंक्स टुडेमध्ये हेच नाही तर यासोबतच बाॅलिवूडचे अनेक कलाकार देखील सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नरेंद्र मोदी, अश्विनी वैष्णव यासारखे राजकिय मंडळी देखील उपस्थित असणार आहेत. बाॅलिवूडमधील रविना टंडन आणि कंगना रणौत यांसारख्या बॉलिवूड कलाकार देखील उपस्थित असणार आहेत.