मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्राने एका पॉडकास्ट मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत धक्कादायक खुलासे केले होते. इंडस्ट्रीतील ठराविक लोकांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे काम मिळणं बंद झाल्याचं तिने सांगितलं. यामुळेच अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्रियांका म्हणाली. तिच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी पुढे येत पाठिंबा दिला. गायक आणि संगीतकार अमाल मलिक यानेसुद्धा त्याचा कटू अनुभव सांगितला. आता अभिनेते शेखर सुमन यांनी ट्विट करत बॉलिवूडमधील गटबाजीविरोधात निशाणा साधला आहे. मला आणि माझ्या मुलाला जाणीवपूर्वक काही प्रोजेक्ट्समधून काढून टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
‘मला इंडस्ट्रीतील किमान चार लोक असे माहीत आहेत ज्यांनी माझ्या आणि माझा मुलगा अध्ययन याच्याविरोधात गटबाजी करत आम्हाला अनेक प्रोजेक्ट्समधून बाहेर काढलं. हे मी खात्रीने बोलू शकते. या गुंडांचा दबदबा खूप आहे आणि ते सापापेक्षाही जास्त धोकादायक आहेत. पण खरंतर ते आमच्या वाटेत अडथळे निर्माण करू शकतात पण ते आम्हाला रोखू शकत नाहीत’, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं.
Priyanka Chopra’s sensational revelation has not come as a https://t.co/QWVcCbvmoA is well known the way the cabal within the film industry https://t.co/Tp75gHCDlH will oppress, suppress and persecute you till you are https://t.co/YgQcqJykYb happened with SSR.
— Shekhar Suman (@shekharsuman7) March 30, 2023
‘हे इतरांसोबतही घडू शकतं. इंडस्ट्रीत अशाच प्रकारची वागणूक मिळते. तुम्ही ते सहन तरी करा किंवा मग निघून जा. प्रियांकाने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि देवाच्या कृपेने ते बरंच झालं. भारताचं हॉलिवूडमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी आता आपल्याकडे खरा ग्लोबल चेहरा आहे. प्रत्येक वाईट गोष्टीमागे काहीतरी सकारात्मक गोष्ट दडलेली असते, असं म्हणतात ते हेच. प्रियांकाने केलेला हा खुलासा काही धक्कादायक नाही. ही इंडस्ट्री कशी चालते, हे सर्वांनाच माहीत आहे. तुमच्यावर अत्याचार होईल, तुम्हाला दडपण आल्यासारखं वाटेल, तुमचा छळही होईल. एसएसआरसोबत (सुशांत सिंह राजपूत) हेच घडलं’, असंही त्यांनी लिहिलं.
I know of atleast 4ppl in the industry who have ganged up to have me n adhyayan removed from many projects.i know it for sure.These ‘gangsters’ have a lot of clout and they are more dangerous than a rattle snake.But the truth is they can create hurdles but they cannot stop us.
— Shekhar Suman (@shekharsuman7) March 30, 2023
शेखर सुमन यांनी 1984 मध्ये ‘उत्सव’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी विविध चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. देख भाई देख, मूव्हर्स अँड शेकर्स, वाद जनाब यांसारख्या टीव्ही शोजमध्येही ते झळकले. बिग बॉसच्या 16 व्या सिझनमधील स्पेशल सेगमेंटचं सूत्रसंचालनसुद्धा त्यांनी केलं होतं. शेखर यांचा मुलगा अध्ययन सुमनने 2008 मध्ये ‘हाल ए दिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नुकताच तो ‘चुप’ या चित्रपटामध्ये झळकला.
अभिनेत्री कंगना रनौतनेही प्रियांकाला पाठिंबा दर्शविला होता. करण जोहरला ‘मूव्ही माफिया’ म्हणत तिने जोरदार टीका केली होती. अपूर्व आसरानी, ओनीर आणि मीरा चोप्रा यांनीसुद्धा प्रियांकाच्या बाजूने वक्तव्य केलं होतं.