‘हीरामंडी’ मध्ये शेखर सुमन यांनी दिलेल्या ‘तो’ सीन, सेक्सशी संबंधित सीनवर म्हणाले…

| Updated on: May 04, 2024 | 12:01 PM

Heeramandi | 'हीरामंडी' सीरिजमधील काही सीन तुफान चर्चेत, अभिनेते शेखर सुमन यांनी दिलेला 'तो' सीन, सेक्सशी संबंधित सीनवर त्यांचं मोठं वक्तव्य.. चर्चांना उधाण... सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे... अनेक कारणांमुळे सीरिज चर्चेत...

हीरामंडी मध्ये शेखर सुमन यांनी दिलेल्या तो सीन, सेक्सशी संबंधित सीनवर म्हणाले...
Follow us on

दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांची पहिली वेब सीरिज ‘हीरामंडी’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. सीरिजला चाहत्यांकडून देखील प्रेम मिळत आहे. सीरिजमध्ये अभिनेते शेखर सुमन आणि त्यांचा मुलगा अध्ययन सुमन याने देखील मुख्य भूमिका साकारली आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शेखर सुमन यांनी सीरिजमधील एका सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सीजमध्ये एक सीन आहे, ज्यामध्ये शेखर सुमन ‘ओरल सेक्स’ करताना दिसत आहेत. यावर शेखर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काय आहे सीन?

‘हीरामंडी’ सीरिजमध्ये एक सीनमध्ये शेखर सुमन पूर्ण नशेत आहेत. आजू-बाजूला काय घडत आहे, याचं त्यांना काहीही भान नसतं. सीमध्ये शेखर आणि मनिषा कोईराला एका कॅरिजनमध्ये बसलेले दिसत आहेत. शेखर नशेत असताना कॅरिजनबाहेर लघवी करतात आणि पुन्हा कॅरिजनमध्ये येतात. तेव्हा मनिषा कोईराला दुसऱ्या बाजूला बसलेली असते. संबंधित कशाप्रकारे शूट करण्यात आला याबद्दल खुद्द शेखर यांनी सांगितलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शेखर सुमन म्हणाले, ‘सीन स्क्रिप्टेड नव्हता. सीन शूट होण्यापूर्वी संजय यांनी मला बोलावलं आणि म्हणाले सीनमध्ये काही विचित्र बदल करण्याच्या विचारत आहे. तुम्ही त्यासाठी तयार आहात का? त्यांनी मला सीन पूर्णपणे समजावून सांगितला. ‘

हे सुद्धा वाचा

संजय यांना शेखर म्हणाले, ‘आयुष्यात फार काही विचित्र असं काहीही नसतं आणि मी सीन करण्यासाठी होकार दिला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीन एका टेकमध्ये पूर्ण झाला. सीन संपल्यानंतर संजय यांच्याकडे गेलो, तेव्हा ते मला म्हणाले, Magnificent… त्यानंतर पॅकअप झालं…’

पुढे शेखर सुमन म्हणाले, ‘माझ्या जवळ सेटवरील काही लोकं आली म्हणाली, धन्यवाद सर… नाही तर, पूर्ण दिवस हेच सुरु असतं… जर दुसऱ्या कोणत्या अभिनेत्याकडून झालं नसतं, तर आणखी सात तास लागले असते…’ सध्या सर्वत्र शेखर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

‘हीरामंडी’ सिनेमात अभिनेत्री मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, संजिदा शेख, अदिती राव हैदरी, शर्मीन सेगल, रिचा चड्ढा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सीरिजची कथा लाहोर याठिकाणी असलेल्या हीरामंडी आणि तेथील सुंदर महिलांच्या आयुष्याभोवती फिरताना दिसत आहे.