इतके भयानक ओठ… शर्लिनचा व्हिडीओ पाहून नेटकरीच घाबरले

| Updated on: Apr 21, 2024 | 2:56 PM

Sherlyn Chopra | शर्लिनचे ओठांना नेमकं झालं तरी काय? अभिनेत्रीच्या ओठांची सर्वत्र चर्चा, व्हिडीओ तुफान व्हायरल... राखी सांवत हिच्यावर निशाणा साधत असताना शर्लिन चोप्रा तिच्या ओठांमुळे चर्चेत... अनेकांनी कमेंट करत अभिनेत्रीवर साधला निशाणा...

इतके भयानक ओठ... शर्लिनचा व्हिडीओ पाहून नेटकरीच घाबरले
Follow us on

बोल्ड सीनसाठी ओळखली जाणारी मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्लीन चोप्रा एक हॉट व्हिडीओ नुकताचं समोर आला आहे. व्हिडीओमध्ये शर्लिन चोप्रा बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत हिच्यावर निशाणा साधताना दिसत आहे. पण राखी सावंत हिच्या निशाणा साधत असताना शर्लिन स्वतः वादात्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या शर्लिन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शर्लिन हिचे ओठ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

व्हिडीओमध्ये बोलत असलेल्या शर्लिन हिचे ओठ अतिशय जाड दिसत असल्यामुळे अभिनेत्रीने ओठांची प्लॅस्टिक सर्जरी केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. अनेकांनी कमेंट करत ‘शर्लिन हिच्या ओठांना काय झालं आहे?’ असं देखील विचारत आहेत.

हे सुद्धा वाचा

 

 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शर्लिन चोप्रा हिच्या व्हिडीओची आणि ओठांची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीला अनेकांनी ट्रोल देखील केलं आहे. सांगायचं झालं तर, ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा शर्लिन हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. याआधी देखील अभिनेत्री अनेकदा तिच्या लूक आणि कपड्यांमुळे देखील ट्रोल करण्यात आलं आहे.

व्हिडीओमध्ये राखी सावंत हिच्याबद्दल काय बोलत आहे शर्लिन चोप्रा?

शर्लिन, राखी हिच्यावर निशाणा साधत म्हणते, ‘जी मुलगी कायम माध्यमांसमोर बोलत असते की, मी गरजू आणि पीडित महिलांना न्याय करण्यासाठी काही तरी करु इच्छीत आहे… सर्वप्रथम तिने स्वतःसाठी काहीतरी करावं… जी मुलगी स्वतःसाठी काही करु शकत नाही, ती समाजासाठी काय करणार आहे… ‘ राखी देखील कायम वादाच्या भोवऱ्यात असते. राखी हिला देखील कायम ट्रोलिंगचा सामना करावा लागतो…

शर्लिन चोप्रा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या पतीवर देखील शर्लिन हिने गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे देखील अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लगतो.

स्वतः शर्लिन चोप्रा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण अनेक पोस्टमुळे अभिनेत्रीवर नेटकऱ्यांकडून निशाणा साधला जातो.. आता अभिनेत्री तिच्या ओठांमुळे चर्चेत आली आहे.