Miss Universe 2023 Winner : मिस युनिव्हर्स 2023 च्या विजेतीच्या नावाची घोषणा अखेर झाली आहे. 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेतील निकारागुआच्या शेन्निस पलासियोस ही ठरली आहे. जगातील अनेक सुंदर मॉडेल्सना मागे टाकत शेन्निस पलासियोस हिने ‘मिस युनिव्हर्स 2023’ च्या किताबावर स्वतःचं नाव कोरलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शेन्निस पलासियोस हिची चर्चा रंगली आहे. 72 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा एल साल्वाडोर येथील जोसे अडोल्फो पिनेडा एरिना येथे आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या वर्षाची मिस युनिव्हर्स 2023 कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मिस युनिव्हर्स 2023 किताब शेन्निस पलासियोस हिने जिंकला आहे.
‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी शेन्निस पलासियोस हिला शुभेच्छा दिल्या आहे. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकल्यामुळे शेन्निस पलासियोस आनंदी आहे. विजेती म्हणून स्वतःच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शेन्निस पलासियोस भावुक देखील देखील झाली.
MISS UNIVERSE 2023 IS @sheynnispalacio !!!! @mouawad #72ndMISSUNIVERSE #MissUniverse2023 pic.twitter.com/mmR90DJ16m
— Miss Universe (@MissUniverse) November 19, 2023
मिस युनिव्हर्स 2022 आर बोनी गेब्रियल हिने शेन्निस पलासियोस हिला ‘मिस युनिव्हर्स 2023’ चा ताज घातला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी शेन्निस पॅलासिओस ही निकारागुआची पहिली महिला आहे. त्यामुळे ‘ब्युटी क्वीन’ हे किताब जिंकणे तिच्यासाठी देखील तेवढंच महत्त्वाचं होतं. सध्या संपूर्ण जगात फक्त आणि फक्त शेन्निस पलासियोस हिची चर्चा रंगली आहे. शेन्निस हिचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.
यावेळी मिस युनिव्हर्स निवडण्यासाठी स्पर्धकांना वेगवेगळ्या स्पर्धांचा सामना करावा लागला. संध्याकाळी गाउन आणि स्विमवेअरमध्ये देखील मॉडेल्सना परफॉर्म करावं लागलं. ‘मिस युनिव्हर्स 2023’ च्या अंतिम सोहळ्यात GRAMMY विजेते जॉन लीजेंड यांनी देखील उपस्थितांना आपल्या संगीताने मंत्रमुग्ध केले.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मिस युनिव्हर्स 2023’ मध्ये तब्बल 84 स्पर्धकांनी भाग घेतला होता. ‘मिस युनिव्हर्स 2023’ शो जवळपास 13000 लोक लाईव्ह पाहात असल्याची देखील चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.