तिथे ईडी जप्त करतेय प्रॉपर्टी आणि इथे खरेदी करतोय करोडो रुपयांची कार

| Updated on: Aug 01, 2024 | 7:12 PM

ईडीकडून एकीकडे मालमत्ता जप्त होत असतानाच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी नवीन कार खरेदी केली आहे. या कारची किंमत करोडोंच्या घरात आहे. ही नवीन कार घेऊन घराबाहेर जात असताना तो स्पॉट झाला. सोशल मीडियावर या नव्या कारची चर्चा आहे.

तिथे ईडी जप्त करतेय प्रॉपर्टी आणि इथे खरेदी करतोय करोडो रुपयांची कार
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याने एक स्टाइलिश आणि आकर्षक कार खरेदी केली आहे या कारची किंमत कोटींमध्ये आहे. सोशल मीडियावर या कारची चर्चा आहे. राज कुंद्राच्या या गाडीचा व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेत आहे.राज कुंद्राच्या जुहूच्या घराबाहेर ड्राइव्हसाठी त्याची ही नवीन ब्रिटीश लक्झरी स्पोर्ट्स कार लोटस इलेक्ट्री घेऊन जाताना तो दिसत आहे.

किती आहे कारची किंमत

Lotus Electra या कारची किंमत 2.55 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत 2.99 कोटी रुपये आहे. Eletra तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – बेस मॉडेल Eletre S आहे आणि शीर्ष मॉडेल Lotus Eletre R आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज नकारात्मक गोष्टींसाठी चर्चेत आहे.

ईडीने जप्त केली मालमत्ता

जून 2024 मध्ये, मुंबई सत्र न्यायालयाने शिल्पा, राज आणि त्यांची कंपनी सत्ययुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड यांच्याविरुद्ध सोन्याच्या योजनेत 90.38 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. बीटकॉइन फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून या जोडप्याचीही चौकशी सुरू होती. ईडीने आरोप केला होता की राज यांनी इतरांसह लोकांकडून 6,600 कोटी रुपयांची मोठी रक्कम गोळा केली आणि बिटकॉइनच्या रूपात दरमहा 10 टक्के परतावा देण्याचे वचन दिले.

ईडीने त्याची मुंबई आणि पुण्यातील मालमत्ता जप्त केली होती. मात्र, राज यांच्या वकिलाने एक निवेदन जारी केले होते की, त्यांना ईडीच्या निष्पक्ष तपासावर विश्वास आहे.

पोर्नोग्राफिकमध्ये नाव आल्याने टीका

पोर्नोग्राफिक घोटाळ्यात देखील नाव आल्याने राज कुंद्रावर बरीच टीका झाली होती. पत्नी शिल्पा शेट्टीने देखील यावर राज कुंद्रावर नाराज होती. हे करायची गरज का होती असा प्रश्न देखील तिने राज कुंद्राला केला होता. राज कुंद्रा याने यूटी 69 या बायोपिकमधून अभिनयात पदार्पण केले होते. हा चित्रपट नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता.