Shilpa Shetty | ‘या’ गंभीर आजारामुळे शिल्पा शेट्टी हिने केलाय ‘गर्भपाता’चा सामना

| Updated on: Jul 11, 2023 | 2:39 PM

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर हिने केलाय 'गर्भपाता'चा सामना; खु्द्द अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग... चार वर्ष अभिनेत्रीने पाहिली दुसऱ्या बाळाची वाट

Shilpa Shetty | या गंभीर आजारामुळे शिल्पा शेट्टी हिने केलाय गर्भपाताचा सामना
Follow us on

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने १५ फेब्रुवारी २०२० मध्ये सरोगेसीच्या माध्यमातून मुलगी समिषा कुंद्रा हिचं जगात स्वागत केलं. मुलीच्या जन्मानंतर शेट्टी आणि कुंद्रा कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. शिल्पा हिची मुलगी आता तीन वर्षांची झाली आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर मुलीसोबत फोटो पोस्ट करत असते. पण पहिल्या मुलाच्या जन्मानंतर एका गंभीर आजामुळे अभिनेत्री गर्भपाताचा देखील सामना केला आहे. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्रीने तब्बल चार वर्ष दुसऱ्या बाळासाठी प्रतीक्षा केली. याबद्दल खुद्द अभिनेत्रीने एक वक्तव्य केलं आहे.

शिल्पा शेट्टी म्हणाली, ‘वियान याच्या जन्मानंतर दुसऱ्या बाळासाठी मी प्रचंड प्रयत्न करत होती. पण एका ऑटो इम्यून आजारामुळे माझ्यासाठी शक्य होत नव्हतं. हा एक गंभीर आजार आहे आणि आजाराचं नाव एपीएलए असं आहे.. जेव्हा मी गरोदर रहायची तेव्हा या आजारामुळे मला गर्भपाताचा सामना करावा लागत होता.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझा मुलगा वियाल याला सिंगल चाईल्ड म्हणून मला मोठं करायचं नव्हतं. मला जशी एक बहीण आहे, त्याचप्रमाणे वियान याला देखील एक भाऊ किंवा बहीण असावी अशी माझी इच्छा होती. एक अशी वेळी आली मी मुल दत्तक घ्यायचा देखील विचार केला. पण ते शक्त झालं नाही.’

‘दुसऱ्या बाळासाठी मी चार वर्ष प्रतीक्षा केली आणि सरोगेसीचा मार्ग निवडला. जेव्हा आम्हाला कळालं की दुसऱ्यांदा आई – वडील होणार आहोत, तेव्हा आम्ही नवीन वेळापत्रक तयार केलं आणि एक महिना काहीच काम केलं नाही. पूर्ण वेळ आम्ही आमच्या चुमिकलीला दिला.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

शिल्पा शेट्टी हिने १५ फेब्रुवारी २०२० मध्ये मुलगी समिषा हिचं जगात स्वागत केलं. पण अभिनेत्रीने २० फेब्रुवारी रोजी लेकीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. शिल्पा शेट्टी हिने २००९ मध्ये उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्री वियान याला जन्म दिला. त्यानंतर अभिनेत्री सरोगेसीच्या माध्यमातून एक मुलीची आई झाली.

शिल्पा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. शिवाय अभिनेत्री वर्कआऊटचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांनी फिट राहण्याचं आवाहन करत असते.