Shilpa shetty Post After ED Raids: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्रा याच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होत आहे. राज कुंद्रा यांच्यावर अश्लील सिनेमांचं चित्रण आणि विक्रीचे आरोप आहे. याच कारणामुळे राज कुंद्रा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देखील अडकला आहे. याच कारणामुळे राज कुंद्राच्या अनेक ठिकाणी ईडीने नुकतेच छापे टाकले होते. सध्या सर्वत्र राज कुंद्रा याची तुफान चर्चा रंगील आहे. यावर अद्यार शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण आता वादग्रस्त परिस्थितीत शिल्पाने सोशल मीडिया पोस्ट केली आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शिल्पा शेट्टी हिने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री योगा करताना दिसत आहे. शिल्पाने योगा करताना फोटो पोस्ट केला आहे. पण अभिनेत्रीच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘आयुष्यात परमानेंट असं काहीच नसतं… ‘ असं अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली आहे.
पुढे शिल्पा म्हणते, ‘ स्पाइनल वेव्ह फ्लो हे एक तंत्र आहे जे मणक्यातील अडथळे सोडवण्यासाठी आणि स्पाइनल वेव्ह ट्रिगर करण्यासाठी डिझाइन केलंले आहे. मज्जासंस्थेमध्ये आराम निर्माण करणे आणि शरीराला तणावमुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे याचं उद्दिष्ट आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते… असं देखील अभिनेत्री म्हणाली.
सांगायचं झालं तर, ईडीच्या छापेमारीनंतर, राज कुंद्रा यांच्याकडून एक स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये राज याने ईडीला सर्व प्रकारची मदत करेल असं सांगितलं… या प्रकरणात मी लवकरच निर्दोष साध्य होईल… कधी न कधी तरी सत्य समोर येईल.
राज कुंद्रानेही लोकांना विनंती केली होती की, पत्नी शिल्पा शेट्टीचं नाव या प्रकरणात ओढू नये. मात्र, राज कुंद्राच्या वक्तव्य केल्यानंतरच त्याला ईडीकडून समन्सही बजावण्यात आलं, ज्यामध्ये राज यांची चौकशी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. या आठवड्यात ईडी राज कुंद्राची चौकशी करू शकते. अशी माहिती देखील समोर येत आहे.