मुंबई : 13 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम तिच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री सोशल मीडियावर मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिची चर्चा सुरु आहे. आता देखील अभिनेत्री एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टी स्टारर ‘सुखी’ सिनेमा २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या अभिनेत्री सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त आहे.
सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान, अभिनेत्री तिच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सांगताना दिसत आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘माझा सुरुवातील ‘सुखी’ सिनेमासाठी नकार होता. पण पती राज कुंद्रा याने मला सिनेमा करण्यास सांगितलं. मी आणि राज चांगले मित्र आहोत. मी माझ्या मित्रासोबत लग्न केलं आहे.’
‘सुखी सिनेमात मला काम करायचं नव्हतं. पण राज याने मला सिनेमात काम करण्यासाठी सांगितलं. कारण या सिनेमाला मी योग्य न्याय देवू शकते. मी आज फक्त पती आणि सासू यांची साथ असल्यामुळे काम करु शकते. मुलगा आणि मुलगी असल्यानंतर काम करणं फार कठीण असतं. पण माझ्या पती आणि सासूंनी सांगितलं तू सिनेमा कर घर आम्ही सांभाळू.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जेव्हा मी पूर्ण खचली.. पण तेव्हा माझ्यासोबत माझी आई होती. तिने मला सर्व संकटांवर मात करण्यास शिकवलं आहे..’ सध्या अभिनेत्री तिच्या आगामी सिनेमामुळे देखील चर्चेत आहे.
शिल्पा शेट्टी हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘सुखी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री एका पंजाबी गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात शिल्पा हिच्यासोबत अमित साध, कुशा कपिला, पवलीन गुजराल, दिलनाज ईराणी, चैतन्य चौधरी आणि ज्योती कपूर महत्त्वाच्या भूमिकत दिसणार आहे. सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरु आहे.
शिल्पा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.