शिल्पा शेट्टी हिच्या पतीचा संताप, ‘UT 69’ चित्रपटाला बायकॉट करण्याचे ऐकताच चढला राज कुंद्राचा पारा

| Updated on: Oct 28, 2023 | 5:47 PM

शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राज कुंद्रा हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. राज कुंद्रा हा त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसत आहे.

शिल्पा शेट्टी हिच्या पतीचा संताप, UT 69 चित्रपटाला बायकॉट करण्याचे ऐकताच चढला राज कुंद्राचा पारा
Follow us on

मुंबई : शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा त्याच्या आगामी यूटी 69 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. मात्र, सोशल मीडियावर या चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी केली जातंय. आता यावरच थेट बोलताना राज कुंद्रा हा दिसलाय. बायकॉट करणाऱ्या एक पोस्टवर कमेंट करत राज याने थेट म्हटले की, कृपया मला एका महिलेचे नाव सांगा जी तुमच्या दाव्यांचे समर्थन करू शकते मॅडम… दगड फेकणे खूप सोपे आहे, पुराव्याशिवाय बोलू नका. देव तुम्हाला आशीर्वाद देवो, लोकांबद्दलचा हा द्वेष निर्माण केला गेला आहे… फक्त सत्याचा विजय होतो #UT69…

आता राज कुंद्रा याने दिलेल्या या उत्तराची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. एका महिलेने थेट लिहिले होते की, या व्यक्तीने ज्याप्रकारे महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान केला आहे, त्यामुळेच याच्या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. या चित्रपटावर बहिष्कार टाका…अशा पोस्ट महिलेने केली होती. यावरच राज कुंद्रा याने उत्तर दिसलंय.

राज कुंद्रा याच्या यूटी 69 या चित्रपटातून मोठे खुलासे हे केले जाणार आहेत. यूटी 69 चित्रपटाच्या माध्यमातून राज कुंद्रा हा जेलमधील 69 दिवसांबद्दल खुलासा कणार आहे. विशेष म्हणजे यूटी 69 चित्रपटामध्ये राज कुंद्रा हाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना राज कुंद्रा हा दिसतोय.

यूटी 69 चित्रपटाच्या एक कार्यक्रमात थेट राज कुंद्रा हा ढसाढसा रडताना दिसला. राज म्हणाला होता की, मला काय बोलायचे ते नक्कीच बोला. पण माझ्या मुलांना आणि माझ्या पत्नीला अजिबात नाही. कारण त्यांनी तुमचे काहीच बिघडवले नाहीये. हे सर्व बोलताना राज कुंद्रा हा खूप जास्त भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाले.

राज कुंद्रा याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. राज कुंद्रा याला थेट पाॅर्न किंग म्हटले गेले. राज कुंद्रा हा 69 दिवस जेलमध्ये देखील राहिला. राज कुंद्रा याचे थेट पाॅर्न प्रकरणात नाव आल्याने अनेकांनी शिल्पा शेट्टी हिला टार्गेट करण्यास सुरूवात केली. इतकेच नाही तर अनेकांनी शिल्पा शेट्टी हिला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केली.