Bigg Boss 16 Winner: कोण होणार विजेता ? फोटोमध्ये पाहा सलमना खान याने कोणत्या स्पर्धकाचा धरलाय हात….

| Updated on: Feb 12, 2023 | 1:24 PM

'बिग बॉस १६' फिनालेची उत्सुकता चाहत्यांमध्ये शिगेला... चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी करतायेत प्रयत्न, पण ट्रॉफीसाठी 'या' दोन स्पर्धकांमध्ये मोठी शर्यत

Bigg Boss 16 Winner: कोण होणार विजेता ?  फोटोमध्ये पाहा सलमना खान याने कोणत्या स्पर्धकाचा धरलाय हात....
Follow us on

Bigg Boss 16 Grand Finale : लवकरच चाहते आणि स्पर्धकांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण आज काही तासांतच बिग बॉस १६ (Bigg Boss 16) शोच्या विजेत्याची घोषणा होणार आहे. सध्या सर्वत्र ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16 Grand Finale) ची चर्चा रंगत आहे. शोच्या फिनालेची जय्यत तयारी आता पूर्ण झाली आहे. मोठ्या उत्साहात अभिनेता सलमान खान ‘बिग बॉस १६’ च्या स्पर्धकाची घोषणा करणार आहे. यासाठी प्रत्येक चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देताना दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनची ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी कोणता स्पर्धक घरी घेवून जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘बिग बॉस १६’ च्या फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाने प्रयत्न केले. पण टॉप ५ च्या यादीत आपलं स्थान पक्क करत शिव ठाकरे , एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भनोट आणि अर्चना गौतम हे पाच स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. पण आता या पाच जणांपैकी विजेता कोण होणार हे लवकरच कळणार आहे. पण ट्रॉफी जिंकण्यासाठी शिव ठाकरे (shiv thakare) आणि प्रियंका चौधरी (priyanka choudhary) यांच्यात ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

सोशल मीडियावर सर्वत्र शिव ठाकरे आणि प्रियंका चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. एवढंच नाहीतर, दोघांच्या फॅनपेजवरुन अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिव आणि प्रियंका यांनी शोच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक प्रकरणात पुढाकार घेतला. शिवाय दोघांनी भावनात्मक आणि विचार करुन खेळी खेळली. आता ट्रॉफीसाठी शर्यतीत शिव आणि प्रियंका असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. (priyanka choudhary bigg boss)

 

एवढंच नाही तर, प्रियंकाच्या चाहत्यांनी तर तिला विजेती म्हणून घोषित देखील केलं आहे. फोटोमध्ये सलमान खान याने प्रियंकाचा हात धरत…. ती विजयी झाल्याची घोषणा केली आहे आणि प्रियंकासोबत सलमानच्या दुसऱ्या हाताला शिव ठाकरे असल्याचं दिसत आहे. पण हा फोटे प्रियंकाच्या चाहत्यांनी इडिट केला आहे. सध्या सर्वत्र प्रियंकाच्या फोटोची चर्चा आहे. (Bigg Boss 16 Winner)

प्रियंका हिला फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत आहे. अली गोनी, अर्जुन बिजलानी, देवोवीना भट्टाचार्जी यांच्यासोबत अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी प्रियंका हिला शुभेच्छा दिल्या आहेत. पण बिग बॉस १६ चा विजेत पाहण्यासाठी काही काळ आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.