Sidharth Malhotra – Kiara Advani यांच्यानंतर ‘हे’ प्रसिद्ध कपल अडकणार विवाहबंधनात

| Updated on: Feb 05, 2023 | 2:46 PM

अनेक वर्ष या कपलने एकमेकांना डेट केलं, पण कधीही त्यांचं रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या नाहीत, दिग्दर्शकाने अभिनेत्रीला तुर्कीमध्ये रोमँटिक पद्धतीने लग्नासाठी प्रपोस केल्यानंतर अडकणार लग्नबंधनात

Sidharth Malhotra - Kiara Advani यांच्यानंतर हे प्रसिद्ध कपल अडकणार विवाहबंधनात
Sidharth Malhotra - Kiara Advani यांच्यानंतर 'हे' प्रसिद्ध कपल अडकणार विवाहबंधनात
Follow us on

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सेलिब्रिटींनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. अनेक वर्ष डेट केल्यानंतर किआरा – सिद्धार्थ लवकरच विवाबहबंधनात अडकणार आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सिद्धार्थ आणि किआरा यांच्या लग्नानंतर ‘खुदा हाफिज’ फेम अभिनेत्री शिवालिका ओबरॉय (Shivaleeka Oberoi) आणि ‘दृश्यम 2’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक (Abhishek Pathak) हे कपल विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या सर्वत्र किआरा – सिद्धार्थ आणि शिवालिका – अभिषेक यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.

‘दृश्यम 2’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक गर्लफ्रेंड शिवालिका ओबरॉय हिच्यासोबत ८ – ९ फेब्रुवारी रोजी गोव्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. शिवालिका – अभिषेक गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांची ओळख पहिल्यांदा ‘खुदा हाफिज’ सिनेमाच्या सेटवर झाली. त्यानंतर दोघांच्या भेटीचं प्रमाण वाढत गेलं. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अभिषेकने शिवालिकाला तुर्कीमध्ये रोमँटिक पद्धतीने लग्नासाठी प्रपोज केलं.

 

 

आता गोव्यामध्ये दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. शिवालिका – अभिषेक यांच्या लग्नाची बातमी कळताच चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर शिवालिका – अभिषेक यांना पती – पत्नीच्या रुपात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

अभिषेक पाठक (Abhishek Pathak Father) बॉलीवूडचे दिग्गज निर्माते कुमार मंगत पाठक यांचा मुलगा आहे. तर शिवालिका (Shivaleeka Career) हिने देखील तिच्या करियरची सुरुवात असिस्टेंट डायरेक्टर म्हणून केली. त्यानंतर शिवालिका हिने अभिनय क्षेत्रात पाय ठेवला. तिच्या अभिनयाचं देखील चाहत्यांनी कौतुक केलं.

शिवालिका हिने ‘ये साली आशिकी’ मधून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर शिवालिका ‘खुदा हाफिज’ सिनेमाच्या दोन्ही भागांमध्ये दिसली. ‘खुदा हाफिज’ मध्ये तिने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतले. शिवालिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सिद्धार्थ – किआरा यांचं लग्न
किआरा – सिद्धार्थ लवकरच ६ फेब्रुवारी रोजी विवाबहबंधनात अडकणार आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. दोघांच्या लग्नाची तयारी सध्या मोठ्या उत्साह सुरु आहे. त्यांच्या लग्नात कुटुंब आणि मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत. ४ आणि ५ तारखेला किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या आधीच्या विधी पार पडणार आहेत. (sidharth malhotra kiara advani wedding festivities)

महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सेलेब्रेटी मेहंदी आर्टिस्ट वीना नागदा यांचे फोटो समोर आल्यानंतर किआरा – सिद्धार्थ विवाहबंधनात अडकणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली. आता लवकरच किआरा – सिद्धार्थ पती – पत्नीच्या रुपात चाहत्यांच्या समोर येणार आहे.