Shoaib Malik Wedding : सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या नात्यात दुरावा आला आहे. दोघांचा घटस्फोट झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शोएब मलिकने प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले आहे. शोएब मलिकने सनासोबतचे विवाहाचा फोटो शेअर केले आहेत. शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले दिसत आहे.
शोएब मलिका आणि सना जावेद यांचा विवाह साधेपणाने पार पडल्याचं बोललं जात आहे. या लग्नाला दोन्ही कुटुंबे उपस्थित होते. शोएब मलिकची पत्नी सना जावेद पाकिस्तानातील अभिनेत्री आहे. ती 30 वर्षांची आहे. सनाचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न 2020 मध्ये गायक उमेर जसवालसोबत झाले होते.
शोएब मलिकची ही वधू याआधी अनेक कारणामुळे वादात सापडली आहे. इंडस्ट्रीतील लोकांना ती आवडत नाही अशा देखील चर्चा आहेत. सना जावेदने एकदा प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल मनाल सलीमला ‘दो टक्के की मॉडेल’ म्हटले होते. तेव्हा देखील ती प्रचंड वादात सापडली होती. अनेकांनी तिच्यावर टीका केली होती.
अभिनेत्री महनूर शेखनेही सना जावेदसोबत काम करण्याचा अनुभव जगासमोर शेअर केला. सनाने एकदा मेकअप व्हॅन शेअर करण्यावरून गोंधळ घातल्याचं तिने म्हटले होते. ती खूप गर्विष्ठ आहे. ती कोणाचाही आदर करत नाही. ती अहंकारी आहे. असं महनूरने म्हटले होते.
शोएब मलिक याने 2010 मध्ये सानिया मिर्झा सोबत लग्न केले होते. दोघांचा हा प्रेमविवाह होता. त्यांना दोघांना आता एक मुलगा देखील आहे. लग्नाच्या वेळी देखील भारतातून सानियाच्या या निर्णयाचा विरोध झाला होता. अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. पण 14 वर्षांनंतर दोघेही वेगळे झाले आहेत. शोएबसोबतच्या घटस्फोटावर सानिया मिर्झाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.