कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयासमोर मंगळवारी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. तुरुंगात असलेल्या महिला शिक्षा भोगत असताना गर्भवती होत असल्याची धक्कादायक माहिती न्यायालयासमोर आली. त्यामुळे सुधारगृहात महिला कैद्यांना भेटण्यापासून पुरुष कर्मचाऱ्यांना थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. याप्रकरणी सोमवारी सुनावणी होऊ शकते.
ॲमिकस क्युरी यांनी न्यायालयाला माहिती दिली की,, ‘महिला कैदी शिक्षा भोगत असताना गर्भवती होत आहेत. आतापर्यंत तुरुंगात 196 मुलांचा जन्म झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे महिला कैदी कोठडीत असतानाच गर्भवती होत आहेत. त्यामुळे त्या पुढे तुरुंगात मुलं जन्माला येत आहेत. सध्या अशी 196 मुले पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या तुरुंगात आहेत.
न्यायालयाला माहिती देताना सांगितले गेले की, त्यांनी अलीकडेच एका पोलीस अधिकाऱ्यासोबत सुधारगृहाला भेट दिली होती. तेव्हा मला असे आढळले की एक महिला गरोदर होती आणि इतर किमान 15 महिला मुलांसह राहत होत्या. कारण तुरुंगातच त्यांचा जन्म झाला होता. ही गोष्ट गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आईसोबत राहण्याची परवानगी दिली जाते.
‘पण तुरुगांत महिला गर्भवती होत आहेत याची मला माहिती नाही. याची शक्यताही नाही. पण मी याची नक्की चौकशी करेन असं त्यांनी म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2024 च्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये असलेल्या 60 वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये सुमारे 26 हजार महिला कैदी बंद आहेत. जानेवारीमध्ये 1265 अंडरट्रायल होते तर 448 दोषी सिद्ध झालेल्या महिला आहेत. तर 174 महिलांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
न्यायालयात ही माहिती समोर आल्यानंतर आता यावर चिंता व्यक्त केली जात आहे. कारण कस्टडीमध्ये असताना महिला गर्भवती होणं धक्कादायक आहे. न्यायालयाने देखील ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होते हे पाहावे लागेल.