अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे. रविवारी पहाटे अभिनेत्याच्या घराबाहेर दोन अज्ञात व्यक्तींना गोळीबार केला आहे. गोळीबाराचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण पोलिसांना असे अनेक सीसीटीव्ही सापडले आहेत ज्यामध्ये दोन्ही आरोपी दिसत आहेत. दरम्यान, सलमान खान यांच्या कुटुंबाच्या जवळच्या एका व्यक्तीने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सलमान खान यांच्या कुटुंबाच्या जवळच्या एका व्यक्तीने मोठा खुलासा केला आहे. ‘सलमान खान याला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही. पण तो त्याच्या कुटुंबाला कोणत्याही संकटात पाहू शकत नाही. कुटुंबासाठी अभिनेता चिंतेत आहे.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची चर्चा रंगली आहे.
सलिम खान यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल देखील व्यक्ती म्हणाला, ‘सलिम खान यांनी स्वतःचं घर सोडून दुसरीकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेण्याचा पर्याय सुचवला आहे. या घटनेनंतर संपूर्ण खान कुटुंब एकमेकांसोबत उभे आहेत. खान कुटुंब सध्या घडलेल्या घटनेवर लक्ष न देता, नेहमीप्रमाणे आयुष्य जगत आहेत…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याचीच चर्चा रंगली आहे.
अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार करत आरोपी फरार झाले आहेत. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण पोलिसांना असे अनेक सीसीटीव्ही सापडले आहेत ज्यामध्ये दोन्ही आरोपी दिसत आहेत.
लॉरेन्स विश्नोई अँगलवरूनही पोलीस तपास सुरू झाला आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या संदर्भात झोन 9 डीसीपी कार्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे खळबळ माजली आहे. सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.