मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. नुकताच श्रद्धा कपूर हिने इंस्टा स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमुळे सध्या ती चर्चेत आहे. नुकताच श्रद्धा कपूर हिच्या साहित्याची चोरी झालीये. याबद्दलच बोलतना या व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूर ही दिसत आहे. आता श्रद्धा कपूर हिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूर हिच्या साहित्याची चोरी ही कोणत्याही माणसाने केली नाहीये, चक्क प्राण्याने ही चोरी केलीये. श्रद्धा कपूर हिच्या साहित्याची चोरी चक्क माकडाने केल्याचे सांगताना श्रद्धा कपूर ही दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊयात नेमके घडले तरी काय…
श्रद्धा कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. श्रद्धा कपूर हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक माकड दिसत आहे. याच माकडाने श्रद्धा कपूर हिचे स्नॅक्स चोरी केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना श्रद्धा कपूर हिने एक अत्यंत खास असे कॅप्शन देखील शेअर केल्याचे बघायला मिळतंय. लोकांना श्रद्धा कपूर हिने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच आवडलाय.
श्रद्धा कपूर हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, तूच चोरले आहेस माझे भाकरवडीचे पॅकेट…आता दुसरे काहीही चोरू नकोस…माकड…विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये ते माकड स्पष्टपणे दिसत आहे. श्रद्धा कपूर हिने दिवाळीला मोठी खरेदी केली. चक्क कोट्यवधी रूपये किंमत असलेली गाडी ही श्रद्धा कपूर हिने खरेदी केली. आपल्या नव्या गाडीची झलक श्रद्धा कपूर हिने चाहत्यांना दाखवली.
श्रद्धा कपूर ही सध्या तिचा आगामी चित्रपट स्त्री 2 मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची शूटिंग ही जुलैमध्ये सुरू होणार आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत श्रद्धा कपूर हिने माहिती शेअर केली होती. चाहते हे श्रद्धा कपूर हिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याच्यासोबत धमाका करताना श्रद्धा कपूर ही दिसली.
तू झूठी मैं मक्कार या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे दिसले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच यांची जोडी काम करताना दिसली. यामुळेच निर्मात्यांना तू झूठी मैं मक्कार चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच होत्या. मात्र, म्हणावा तशा धमाका करण्यात या चित्रपटाला अजिबातच यश मिळाले नाही. लोकांनी फार जास्त तू झूठी मैं मक्कार चित्रपटाला प्रेम दिले नाही.