मुंबई | बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. शिवाय आपला आवडता सेलिब्रिटी कोणाला डेट करत आहे. त्याच्या आयुष्यात खास स्थान कोणाचं आहे. हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण अभिनेत्री श्रद्धा कपूर खासगी आयुष्याबद्दल फार क्वचितच बोलताना दिसते. श्रद्धाच्या नावाची चर्चा देखील अनेक अभिनेत्यांच्या नावासोबत झाली. पण अभिनेत्रीने यावर कधीही स्पष्टीकरण दिलं नाही. पण एक अभिनेता आहे, ज्याच्या सोबत अभिनेत्रीचं फक्त नाव जोडण्यात आलं नाही, तर त्यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा देखील रंगल्या. दोघांच्या नात्याबद्दल अभिनेत्रीच्या घरी माहिती झाल्यानंतर त्यांच्या नात्याच्या विरोध करण्यात आला. श्रद्धा गेल्या काही दिवसांपासून तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. पण अभिनेत्री सध्या कोणाला डेट करते हे अद्याप गुपित आहे.
आता श्रद्धा कपूर हिचं खासगी आयुष्य गुपित असलं तरी, एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्रीचं नाव प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर याच्यासोबत जोडण्यात आलं होतं. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉक ऑन २’ सिनेमानंतर फरहान आणि श्रद्धा यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. रिपोर्टनुसार, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
अनेक रिपोर्टनुसार, शक्ती कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे (श्रद्धाची मावशी) फरहान अख्तरच्या अपार्टमेंटमध्ये गेले आणि त्यांनी श्रद्धा कपूरला अपार्टमेंटमधून बाहेर काढल होतं. तेव्हा कोणत्या चर्चा रंगू नये म्हणून श्रद्धा कपूर काहीही न बोलता फरहानच्या घरातून बाहेर पडली. जेव्हा ही गोष्ट वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली तेव्हा शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं..
यावर शक्ती कपूर म्हणाले, ‘हे पूर्णपणे खोटं आहे. अनेकांनी मला हे प्रकरण सांगण्यासाठी फोन केला, पण यावर मला विश्वास बसत नाही.. मी ३५ वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. त्यामुळे मला माहित आहे की याठिकाणी काय होतं म्हणून मी अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देणं टाळतो…’ असं श्रद्धाचे वडील शक्ती कपूर म्हणाले होते.
फक्त शक्ती कपूर यांनीच नाही तर, श्रद्धा कपूर हिने देखील यावर स्पष्टीकरण दिलं. अभिनेत्री म्हणाली, ‘मला काही फरक पडत नाही कारण मला माहित आहे की त्यामध्ये काही तथ्य नाही. खोट्या चर्चा रंगतात त्यानंतर लोक विसरुन जातात.. आम्ही कालाकार आहोत म्हणून आमच्याबद्दल अशा गोष्टी ऐकायला, वाचायला लोकांना आवडतं..’ असं अभिनेत्री म्हणाली.
श्रद्धा कपूर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘आशिकी २’ सिनेमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. चाहते कायम श्रद्धाच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. सोशल मीडियावर देखील श्रद्धाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.