मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : झगमगत्या विश्वातल सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगलेली असते. गेल्या काही दिवसांपासून भारतील क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. याच दरम्यान शुबमन याच्याबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे.
एका डेटिंग ॲपवर शुबमन गिल याचं अकाऊंट असल्याचा दावा एका सोशल मीडिया युजरने केला आहे. राया नावाच्या एका डेटिंग ॲपवर शुबमन गिल याचं अकाऊंट असल्याचा स्क्रिनशॉट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये शुबमन याची प्रोफाईल दिसत आहे.
If this is true, then what about Sara?#ShubmanGill https://t.co/S4hkYhaWIe
— Kumar Sourav (@AdamDhoni1) February 21, 2024
शुबमन गिल याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्याचं काम केलं आहे. एक नेटकरी क्रिकेटपटूच्या व्हायरल फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘मला माहिती आहे की, शुबमन खऱ्या आयुष्यात कोणाला डेट करत आहे.’
दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘अफवांमुळे मला आता थकवा आला आहे.’ तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तो साराला डेट करत नव्हता?’ ‘आता साराचं काय होणार?’ अशी कमेंट देखील शुबमन याच्या व्हायरल होत असलेल्या फोटोवर केली आहे.
सांगायचं झालं तर, श्रीमंत व्यक्ती स्वतःचे संपर्क वाढवण्यासाठी RAYA ॲपचा वापर करतात. अनेक सेलिब्रिटी राया ॲपवर आहेत.. असं देखील अनेकदा समोर आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
2023 मध्ये सारा शुबमन गिल याला नाही तर, खास मित्र खुशप्रीत सिंग याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यानंतर खुशप्रीत सिंग आणि सारा यांना अनेक ठिकाणी डेट देखील करण्यात आलं. स्टेडियम, रेड कार्पेट आणि अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांनी एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. पण दोघांनी देखील नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.