Shubman Gill | शुबमन पॅरिसमध्ये लुटतोय सुट्ट्यांचा आनंद, सारा आहे क्रिकेटरची कॅमेरामॅन?

| Updated on: Jul 03, 2023 | 11:39 AM

शुबमन आणि सारा तेंडुलकर यांच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा उधाण... क्रिकेटरने पोस्ट केलेल्या फोटोवर कर्टसी कोणाला? सध्या सर्वत्र सचिनची लेक चर्चेत...

Shubman Gill | शुबमन पॅरिसमध्ये लुटतोय सुट्ट्यांचा आनंद, सारा आहे क्रिकेटरची कॅमेरामॅन?
Follow us on

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर शुबमन गिल फक्त त्याच्या कामगिरीमुळेच नाही, तर खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत आहे. सध्या सर्वत्र क्रिकेटरच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. शुबमन याचं नाव अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबतच  नाही तर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर हिच्यासोबत देखील जोडलं जात आहे. पण काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि शुबमन गिल यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्यानंतर क्रिकेटरचं नाव सारा तेंडुलकर हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. सोशल मीडियावर देखील कायम शुबमन आणि सारा तेंडुलकर यांची चर्चा रंगलेली असते. आता देखील शुबमन एका फोटोमुळे चर्चेत आला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर सध्या पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. शुबमन याची सुट्ट्यांचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट देखील केले आहेत. शुबमन याच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे नेटकरी शुबमन याच्या फोटोसोबत सारा तेंडुलकर हिचं नाव देखील जोडत आहेत..

 

 

एक नेटकरी क्रिकेटरच्या फोटोवर पोस्ट करत म्हणाला, ‘कॅमेरामॅन सारा तेंडुलकर तर नाही ना?’ सध्या सर्वत्र शुबमन गिल याच्या फोटोची चर्चा रंगत आहे. शुनबमन याच्याबद्दल सांगायचं झालं तर, क्रिकेटर वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपपासून दूर आहे. सध्या क्रिकेटर खासगी आयुष्याचा आनंद घेत आहे. सध्या शुबमन फ्रान्स आणि युरोपीय देशांमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

एवढंच नाही तर शुबमन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय सारा तेंडुलकर हिच्यामुळे देखील शुबमन कायम चर्चेत असतो. पण अद्याप दोघांनी देखील त्यांच्या नात्यावर स्पष्ट भूमिका मांडली नाही..

शुभमन याचं नाव फक्त सारा तेंडुलकर हिच्यासोबतच नाही तर, अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत देखील जोडण्यात येत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरुन अनफॉलो केल्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या होत्या. पण शुभमन गिल, सारा तेंडुलकर आणि सारा अली खान यांनी नात्यावर मौन बाळगलं आहे.

एवढंच नाही तर, एका मुलाखतीत शुबमन याने आवडती अभिनेत्री म्हणून सारा अली खान हिचं नाव घेतलं होतं. पण सारा अली खान हिने देखील शुबमन याच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन बाळगलं आहे.