सध्या आयपीएल 2024 मध्ये क्रिकेटपटू शुभमन गिल हिच्याबद्दल सर्वत्र चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शुबमन गिल याच्या चर्चा रंगल्या आहे. सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका समान्यात एका मिस्ट्री गर्लने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्या तरुणीला पाहिल्यानंतर शुबमन देखील गालात हसल्याची चर्चा रंगली आहे. शुबमन याच्या नावाची चर्चा होत असल्यामुळे सारा तेंडुलकर देखील तुफान चर्चेत आहे. तर सध्या ज्या मिस्ट्री गर्लचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, तिचं कनेक्शन हॉलिवूडसोबत असल्याची चर्चा रंगली आहे.
ट्विटर म्हणजे एक्स युजर्सने व्हायरल व्हिडीओ आणि फोटोंमध्ये दिसणारी तरूणी हुबेहूब अभिनेत्री ॲना दे अरमास हिच्यासारखी दिसत असल्याचं सांगितलं आहे. प्रेक्षकांमध्ये कॅमेऱ्यात कैद झालेल्या तरुणीला टाळ्या वाजवताना पाहिल्यानंतर चाहते तिला बाँड गर्ल ॲना डी अरमास म्हणताना दिसत आहेत. तिच्या सौंदर्यावर देखील अनेक जण फिदा झाले आहेत.
I didn’t know that Ana de Armas is also a fan of IPL pic.twitter.com/vrSDATCmMW
— isHaHaHa (@hajarkagalwa) April 17, 2024
सोशल मीडियावर मिस्ट्री गर्लचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून तिची तुलना अभिनेत्री ॲना डी अरमास हिच्यासोबत होताना दिसत आहे… ॲना डी अरमास हिला नाइव्स आउट आणि ब्लेड रनर 2049 म्हणून देखील ओळखलं जातं. मिस्ट्री गर्लचे फोटो पोस्ट करत एक नेटकरी म्हणाला, ‘मला नव्हतं माहिती की ॲना डी अरमास देखील आयपीएलची फॅन आहे…’
व्हायरल होणाऱ्या तरुणीचं कनेक्शन पृथ्वी शॉ याच्यासोबत असल्याचं देखील सांगितलं जात आहे. ती पृथ्वी शॉ याची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा सर्वत्र जोर धरत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त आयपीएलमुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या तरुणीची चर्चा रंगत आहे.
ॲना डी अरमास हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती 35 वर्षांची क्यूबन आणि स्पॅनिश अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत ब्लॉन्ड, डीप वॉटर, घोस्टेड, नॉक नॉक, ब्लेड रनर 2049 आणि नाइव्स आउट यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. एवढंच नाहीतर, तिला अकादमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.