मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० मध्ये वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. अभिनेत्याच्या आत्महत्येला जवळपास दोन वर्ष पूर्णे झाली आहेत. पण आजही अभिनेत्याच्या आठवणी कुटुंब आणि चाहत्यांच्या मनात कायम आहेत. आज सुशांत याचा वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्याच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने सुशांतचे कधीही न पाहिलेले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत भावाच्या वाढदिवसानिमित्त भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या श्वेता सिंह किर्ती हिची सोशल मीडिया पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
फोटोमध्ये सुशांत बहिणीच्या दोन मुलांसोबत खेळताना दिसत आहे. सुशांतसोबत दोन मुलांचा खास फोटो शेअर करत श्वेता सिंह किर्ती म्हणाली, ‘लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू ज्याठिकाणी आहेस त्याठिकाणी आनंदी राहा. कधीतरी आहे तिथून खाली देखील बघ. तुला दिसेल तू काय जादू केली आहेस. मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो आणि कायम वाटत राहिल…’ असं म्हणत श्वेता सिंह किर्ती हिने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या.
श्वेताच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट आणि लाईक करत सुशांत सिंह राजपूत याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्वेता सिंह किर्ती कायम सुशांतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. एवढंच नाही तर, श्वेता कायम भावाला न्याय मिळावा म्हणून लढताना दिसते.
सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे… असं श्वेता सिंह किर्ती कायम म्हणताना दिसते. नुकताच रुग्णालयातील अधिकारी रुपकुमार शाहा यांनी देखील सुशांत याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा खळबळजनक दावा केला. ज्यामुळे पुन्हा सुशांतच्या आत्महत्येचा मुद्दा चर्चेत आला.
दोन वर्षांनंतर देखील सुशांतची आत्महत्या होती की हत्य हे सत्य उलगडू शकलं नाही. सीबीआय तपासानंतर देखील अभिनेत्याच्या निधनाबद्दल कोणतंही सत्य समोर आलं नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर चाहते, कुटुंबासह बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला. आज ही सुशांत सिंह राजपूत चाहत्यांच्या मनात कायम आहे.