टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत श्वेता हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार मोठा खुलासा केला आहे. दुसऱ्या जातीत लग्न केल्याने आईला कसे टोमणे मारण्यात आले यावर श्वेताने पहिल्यांदा मौन सोडलं आहे. शिवाय लेक पलक हिच्यामुळे अभिनेत्रीला काही निर्णय घ्याले लागले… सध्या सर्वत्र श्वेता तिवारी हिची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत श्वेता तिवारी म्हणाली, ‘जेव्हा तुमची पहिल्यांदा फसवणूक केली जाते. तेव्हा तुम्ही दुःखी होता. सतत रडत राहाता… असं माझ्यासोबतच का होतं… असा प्रश्न देवाला करता. नात्यात सर्वकाही ठिक करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता. दुसऱ्यांदा सुद्धा तुम्हाला सारखाच अनुभव आला तर, तुम्हाला कळून जातं दुःख न संपणारं आहे..’
‘तिसऱ्यांदा तुमची फसवणूक झाली तर, या सर्व गोष्टी तुम्हाला दुःख पोहोचवत नाही. नात्याचा कोणताच प्रभाव तुमच्यावर पडत नाही. जेव्हा मला कोणी दुःख पोहोचवतं तेव्हा मी तक्रारी करत बसत नाही. मी स्वतःत्या व्यक्तीपासून दूर होते, मला दुखवणं त्याच्या व्यक्तिमत्त्वात आहे आणि आता दु:खी न होणं माझ्या व्यक्तिमत्त्वात आहे.’
पुढे श्वेता म्हणाली, ‘आता कोणत्याच गोष्टीची पर्वा करत नाही. कालांतराने समोरच्याला कळतं त्याला दुःख होतं. अरे.. ती तर सोडून गेली. माझ्या आयुष्यातून मी ज्या लोकांना काढून टाकते नंतर त्यांना याचा पश्चाताप होतो..’ दोन वेळा लग्न मोडल्यानंतर यातून बाहेर यायला किती वेळ लागला…? असा प्रश्न देखील श्वेताला विचारण्यात आला.
यावर श्वेता म्हणाली, ‘माझ्या पूर्ण कुटुंबात कोणीच लव्हमॅरिज केलं नव्हतं. मी केलं होतं. आमच्या कुटुंबात जातीय समस्या होत्या, तरीही मी आंतरजातीय विवाह केला. लोकांनी आधीच माझ्या आईला टोमणे मारायला सुरुवात केली होती आणि माझ्या लग्नाला जज करण्यास सुरुवात केली होता. सांगायचं झालं तर, श्वेताने 9 वर्षांनंतर पहिला पती राजा चौधरीला घटस्फोट दिला होता.
‘मी तेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हती असं काहीही नव्हतं. पण ती एक भावनिक वेळ होती. पलक हिला वडिलांची गरज होती आणि मला तिला तिच्या वडिलांपासून विभक्त करायचं नव्हतं. पण तुम्ही आनंदी असाल तर तुमचं कुटुंब आनंदी राहील. जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या आनंदी असता. आनंदी वातावरणात राहणं तुमच्या मुलासाठी योग्य नाही… जर दोन लोकं एकत्र राहू शकत नसतील तर वेगळं होणं उत्तम आहे… असं देखील अभिनेत्री म्हणाली.
श्वेता तिवारी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘सिंघम अगेन’ सिनेमात दिसणार आहे. सिनेमात श्वेता हिच्यासोबत अजय देवगन, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, करीना कपूर, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांसारखे लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत.