अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी हिने अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात पलकने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पलक कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील पलक कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील पलक कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर पलक हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पलक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
वयाच्या 23 वर्षी पलक कोट्यवधींचा माया कमावते. रिपोर्टनुसार, पलक तिवारी हिच्याकडे 15.20 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पलक हिची कमाई तिच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर आधारलेली असते. व्हिडीओ सॉन्ग्स, सिनेमे, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी कमाई करते. रिपोर्टनुसार, पलक एका सॉन्ग व्हिडीओसाठी जवळपास 30 लाख रुपये घेते.
पलक तिवारी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, पलक एका सिनेमासाठी जपळपास 50 ते 60 लाख रुपये घेते. वयाच्या 23 व्या वर्षी पलक मोठी कमाई करते. पलकची आई आणि अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे 81 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे. श्वेता तिवारी हिच्या वर्षांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री 10 कोटी कमावत असल्याची माहिती मिळत आहे.
पलक फक्त अभिनयातच नाहीतर, शिक्षणात देखील पुढे आहे. पलक तिवारी हिने मुंबईतील शाळेत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मिठीबाई कॉलेजमध्ये अभिनेत्रीने शिक्षण घेतलं.पलक हिने सायकोलॉजीमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीने अभिनय विश्वात पदार्पण केलं.
पलक तिवारी हिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत देखील चाहते असतात. सोशल मीडियावर देखील पलक कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
पलक फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पलक तिवारी अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.