मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput)आत्महत्येशी निगडित ड्रग्ज प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithni) ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सिद्धार्थ पिठानीला 27 मे रोजी हैदराबादेतून अटक करण्यात आलं होतं. त्याला आज कोर्टात हजर केलं असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर केलं असता 31 मे पर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा कोर्टात हजर केलं असता 4 जूनपर्यंत एनसीबी कोठडी वाढवण्यात आली होती. दरम्यान सिद्धार्थ पिठानीने आपल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती एनसीबीतील सूत्रांनी दिली आहे. (Siddharth Pithani remanded in judicial custody for 14 days)
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) 27 मे रोजी मोठी कारवाई करत सुशांतचा रुममेट आणि महत्त्वाचा संशयित सिद्धार्थ पिठाणी याला बेड्या ठोकल्या. एनसीबी पथकाचे नेतृत्व करणारे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी हा एक महत्त्वाचा संशयित होता. सिद्धार्थ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तीन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं होतं, मात्र एकदाही तो हजर झाला नाही. यामुळे एनसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर होते.
#Maharashtra | Siddharth Pithani, late actor Sushant Singh Rajput’s friend, has been sent to 14-day judicial custody, in connection with drugs case: Narcotics Control Bureau (NCB), Mumbai
— ANI (@ANI) June 4, 2021
सिद्धार्थच्या घरात आक्षेपार्ह कागदपत्रं सापडली आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या घरात सापडलेला इलेक्ट्रॉनिक पुरावा अधीक्षक किरण बाबू यांनी जप्त केला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ही 35 वी अटक आहे. सिद्धार्थ हा सुशांतच्या ड्रीम टीममध्ये होता. तो सुशांतला अंमली पदार्थ देत असल्याचा आरोप आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत (Sushant Singh Rajput) आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे, असा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र सुशांतने आत्महत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं.
निवृत्तीनंतरच आनंदात जगायचंय, मग आजच सुरु करा NPS अकाऊंट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रियाhttps://t.co/wuSYMdgqXK #NPS #Business #SavingsTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 4, 2021
संबंधित बातम्या :
सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई, रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक
सिद्धार्थ पिठाणीची अटक रियाला देखील अडचणीत आणणार? अडचणी आणखी वाढण्याची शक्यता!
Siddharth Pithani remanded in judicial custody for 14 days